आ.जयंत पाटील,आ.रोहितदादा पवार व प्रविणजी गायकवाड यांच्या उपस्थितीत सोमवारी शेतकरी मेळावा संपन्न होणार आहे-- डॉ भाई बाबासाहेब देशमुख*
-----------------------------
शेतकरी कामगार पक्षाच्या , पुरोगामी युवक संघटनेच्या व स्व आबासाहेब प्रेमींच्या वतीने सोमवार दिनांक११/३/२०२४ रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आसुन
सांगोला विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करता राज्य सरकारपर्यंत आपल्या रास्त मागण्या पोहचवण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित महत्वपूर्ण आहे.
सध्या आपल्या भागांमध्ये सरासरीच्या अत्यंत कमी पाऊस पडल्याने विहरींपच्या पाण्याची पातळी आपोआपच खाली गेली आहे त्यामुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे..आज मितीला जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभिर बनला आहे तसेच बहुतांश भागातील स्त्रीयांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे..या गोष्टीचा विचार करून दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात यासाठी हा शेतकरी मेळावा आयोजीत केला आहे.
तसेच दुधाचे दर ताबडतोब वाढवावेत उत्पादन खर्चाचा विचार करुन पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुधाचे दर वाढवुन द्यावेत व पशुखाद्याचे दर कमी करावेत या मागणीसाठी हा शेतकरी मेळावा आयोजीत केलेला आहे
तसेच शालेय विद्यार्थ्यांचे बहुतांश प्रश्न आजही प्रल़बीत आहेत...तसेच भरमसाठ वाढलेले विजेचे दराचा ही विचार व्हावा सरकारने दुष्काळ जाहीर केला तर मग विजेच्या बिलामध्ये सुध्दा सवलत देणे गरजेचे आहे या मुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल तसेच
टेंभू म्हैसाळ योजनेच्या पाण्याने नदीकाठचे बंधारे भरले जावेत यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदनाद्वारे संमधीत अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे..पऱतु आजुन नदिकाठचे बंधारे भरुन घेतले नाहीत त्या मागणीसाठी हा शेतकरी मेळावा आहे..आशा अनेक मागण्याचा विचार करून सांगोला विधानसभा मतदार संघातील शेतकरी , कष्टकरी छोटे मोठे व्यावसायिक यांना शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून एकत्रित करुन या रास्त मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे..
सदर मेळाव्यास शेतकरी कामगार पक्षाच्या सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे युवा नेते आमदार रोहीत दादा पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी गायकवाड हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत तरी सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी सोमवार दिनांक११/३/२०२४ रोजी मार्केट यार्ड सांगोला येथे सकाळी ११-०० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली आहे