एमएचटी- सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा


‘एमएचटी- सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा


पंढरपूर–शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पदवी अभियांत्रिकी व बी. फार्मसी च्या प्रवेशाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमएएच-एमएचटी सीईटी (पीसीएम व पीसीबी) २०२४ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म मंगळवार, दि.१६ जानेवारी २०२४ पासून ते शुक्रवार, दि.०८ मार्च २०२४ पर्यंत भरता येणार आहेत. बारावी सायन्स मधून उत्तीर्ण झालेल्या व सध्या बारावी सायन्समध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएएच-एमएचटी सीईटी (पीसीएम व पीसीबी) २०२४ साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. 

      बारावी सायन्स नंतर पदवी अभियांत्रिकी व पदवी फार्मसी च्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजली जाणारी एमएएच-एमएचटी सीईटी (पीसीएम व पीसीबी) २०२४ ही परीक्षा शासनाच्या दिलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. साधारणपणे पीसीबी ग्रुपची ही परीक्षा १६ एप्रिल ते २३ एप्रिल २०२४ तर पीसीएम या ग्रुपची सीईटी परीक्षा दि.२५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२४ या दरम्यान होणार आहे. सध्या बारावीची परीक्षा सुरु आहे. सीईटी परीक्षेच्या फॉर्मपेक्षा बारावीचा अभ्यास महत्वाचा असल्याचे विचारात घेवून शासनाने सीईटी परीक्षेच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांना शुक्रवार, दि.०८ मार्च २०२४ पर्यंत सीईटी परीक्षेचे फॉर्म भरता येणार आहेत. या प्रवेश परीक्षेच्या संदर्भात अधिक माहीतीसाठी विद्यार्थ्यांनी स्टेट सीईटी सेलच्या संकेत स्थळाला भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी स्वेरी अभियांत्रिकीचे प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील (मोबा. नंबर–९५९५९२११५४) व प्रा.उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad