२५ वर्षाचा प्रलंबित प्रश्न आमदार समाधान आवताडे साहेब यांच्या प्रयत्नातून अखेर सुटला.
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मंगळवेढा बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवतारी यांच्या हस्ते पार पडले.
टाकळी चे माजी सरपंच बापूसाहेब कदम यांनी टाकळी गावठाण व नवीन प्लॉट एरिया महात्मा फुले नगर या भागातील रस्ते ड्रेनेज लाईट तसेच ओपन स्पेस विकास मंदिर सभामंडप अशा विविध कामांसाठी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या भागातील लोकांची गेल्या पंचवीस वर्षापासून ची ही मागणी होती त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या आमदार निधीतून या भागातील एक कोटी दहा लाख रुपये किमतीच्या विकास कामांना भरघोस निधी दिला आहे.
१) गिरिजात्मक नगर गणेश मंदिर समोर सभा मंडप
२) गिरीजात्मक नगर जगदंबा देवी मंदिरासमोर ग्रामपंचायत जागेत सभा मंडप
३) टाकळी येथील बायपास चौकात एसटी पिकप शेड
४) रेल्वे गेट पासून ते अशोक देठे वस्ती पर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण
५) रेल्वे लाईन ते अशोक देठे घर, महादेव देठे घर ते आय कॅन इन्स्टिट्यूट भिवा देते पर्यंत रस्ता
६) लक्ष्मी टाकळी येथे व्यायाम शाळा बांधणे
७) महात्मा फुले नगर गटर बांधणे व रस्ता सुधारणा करणे
८) जगदंबा नगर अंगणवाडी भोला शिंदे घर ते तानाजी खेडकर ते दगडी पाण्याची टाकी रस्ता सुधारणा करणे
९) देवकते मळा ओढा ते मनोहर देवकते घर रस्ता सुधारणा
१०) शाहूनगर काळे पान शॉप घर ते हमीद शेख पीएसआय घर रस्ता सुधारणा
११) अ.जा. व नव बौद्ध घटकाच्या वस्तीमध्ये हद्दवाढ भागात रस्ता सुधारणा
१२)अ.जा. व नव बौद्ध घटकाच्या वस्तीमध्ये शिवपार्वती नगर रस्ता सुधारणा
१३) लक्ष्मी टाकळी येथील जिल्हा परिषद शाळा महालक्ष्मी मंदिर दलित वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण
१४) महात्मा फुले नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण
१५) अण्णाभाऊ साठे नगर बाबर घर ते अण्णाभाऊ साठे शाळेपर्यंत गटार बांधणे.
या विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी टाकळीचे माजी सरपंच बापूसाहेब कदम, सचिन वाकळे, माऊली माने देशमुख, सुरेश भोसले, बाळासाहेब खपाले, समाधान देठे, संतोष डोंगरे, सारंग महामुनी, जितेंद्र बनसोडे, संतोष व्यवहारे, सुमीत खटावकर, यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ महिला माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.