*मंगळवेढा तालुक्यातील टंचाई संदर्भात आज आमदार आवताडे यांची आढावा बैठक*
मंगळवेढा/प्रतिनिधी - पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये गतवर्षी अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडल्याने निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी आज मंगळवार सकाळी १०.०० वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे टंचाईची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आढावा बैठक बोलावली असून मंगळवेढा तालुक्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी सर्कल, कृषी सहाय्यक, पाणीपुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग तसेच वीज वितरण यांच्यासह सर्व गावचे सरपंच, उपसरपंच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य यांना उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार अवताडे यांच्या संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे
गतवर्षी अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जमिनीमध्ये पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. कमी पावसामुळे सर्व विहिरी कोरड्या पडल्या आहेत तसेच बोअर बंद असल्याने नागरिकांचे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे अतोनात हाल होत आहे. तसेच जनावरांना चारा टंचाई जाणवत आहे. या सर्व बाबींचा विचार करून आमदार आवताडे यांनी सदर आढावा बैठकीचे नियोजन करून वरील दुष्काळजन्य समस्यांवरती उपाय योजना विचार विनिमय व आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे.
तरी मतदार संघातील सर्व नागरिकांनी शेतकऱ्यांनी तसेच संबंधित विभागातील पदाधिकारी व अधिकारी यांनी या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.