मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हुबेहूब साकारले लोकसभेचे कामकाज स्वेरीत 'मेसा' तर्फे 'मॉक पार्लमेंट' हा उपक्रम संपन्न


मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हुबेहूब साकारले लोकसभेचे कामकाज


स्वेरीत 'मेसा' तर्फे 'मॉक पार्लमेंट' हा उपक्रम संपन्न 


पंढरपूर- येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाचाच एक भाग म्हणून लोकसभेचे काम कसे चालते याचा बारकाईने अभ्यास करून शैक्षणिक प्रतिसंसद (मॉक पार्लमेंट) चे आयोजन केले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहासह प्रात्यक्षिक सादरीकरणाद्वारे लोकशाहीचे प्रतीक असणाऱ्या संसदेच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अचूक पद्धतीने प्रदर्शित केलेल्या कौशल्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

        सध्या संसदेच्या माध्यमातून लोकशाहीचे कामकाज कसे चालते ? हे सर्व विद्यार्थ्यांना समजावे या हेतूने स्वेरीचे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस बी. भोसले यांच्या नेतृत्वाखाली, मेसा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन) चे समन्वयक प्रा.संजय मोरे यांच्या सहकार्याने भव्य प्रतिसंसद (मॉक पार्लमेंट) आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची भूमिका साकारताना अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी राजकीय नेत्यांचा हुबेहूब मुखवटा, वेशभूषा, संवाद, हावभाव पाहून राजकीय नेत्यांच्या भूमिका पार पाडल्या. स्पर्धा परीक्षेतही विविध राजकीय बाबींवर प्रश्न विचारले जातात. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अभ्यासाचाच एक भाग म्हणून या प्रतिसंसदेचे आयोजन केले होते. यामध्ये अच्छे दिन, जीएसटी, नोटाबंदी, राफेल, कलम ३७०, भ्रष्टाचार, आर्थिक व्यवस्था, विकास कामे, शिक्षण व्यवस्था, राम मंदिर अशा विविध विषयांवर राजकीय भाष्य करताना राजकीय नेत्यांमधील समतोल राखला गेला. या प्रतिसंसदे मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. अनिल पिसे यांनी सभागृह अध्यक्ष ओम बिर्ला यांची हुबेहूब भूमिका साकारली, दिग्विजय बुरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली. त्याचप्रमाणे सत्यजित गोफणे,अभिषेक मोरडे, रोहन क्षीरसागर, सुयश बुरांगे, युवराज इंगळे, मंगेश खपाले, कृष्णा साठे, सुप्रिया शेलार, अंकिता हिंगमिरे,आरती चौगुले, आलिशा मुलांणी, तृप्ती कदम, कोमल पवार, गौरी गावडे, सोनाली कांबळे, प्रणव पाटील, विशाल सोनकांबळे, प्रतीक्षा चौगुले, गजानन वाघमोडे, प्रताप लवळे, समर्थ बहर्जी, निनाद काळे या विद्यार्थ्यांनी विविध राजकीय नेत्यांच्या भूमिका अगदी हुबेहूब साकारल्या. त्यामुळे महाविद्यालय परिसरात एक वेगळे आणि राजकीय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती इंगळे व अविनाश ननवरे यांनी केले तर सुरज शिंदे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad