*पंढरपूर सिंहगड मध्ये माजी विद्यार्थ्यांची मार्गदर्शन कार्यशाळा*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मंगळवार दिनांक १९ मार्च २०२४ रोजी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी "मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधी" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात "मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधी" या विषयावर आय. बी. एम. कंपनीचे सॅप कन्सल्टंट मिहीर जोशी, इनफिन्टी कंपनीत कार्यरत असलेले डिझाईन इंजिनिअर श्रीयश मुळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानाच्या सुरुवातीस ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांच्या हस्ते मिहीर जोशी आणि डाॅ. समीर कटेकर यांच्या हस्ते श्रीयश मुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळेस बोलताना मिहीर जोशी म्हणाले, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सॅप क्षेत्रात अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत आणि श्रेयश मुळे यांनी मेकॅनिकल डिझाईन क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी याविषयावर मार्गदर्शन केले.
हि कार्यशाळा मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना मिहीर जोशो व श्रेयश मुळे यांनी उत्तरे दिली.
हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. अतुल कुलकर्णी आदीसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.