पंढरपूर सिंहगडच्या अभिनव मुळेस आंतरमहाविद्यालयीन प्रकल्प स्पर्धेत प्रथम पारितोषिक पंढरपूरः प्रतिनिधी

 पंढरपूर सिंहगडच्या अभिनव मुळेस आंतरमहाविद्यालयीन प्रकल्प स्पर्धेत प्रथम पारितोषिक



पंढरपूरः प्रतिनिधी 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या चि. अभिनव प्रफुल मुळे यांनी मंगळवार दिनांक १९ मार्च २०२४ रोजी डॉ. दौलतराव अहेर कॉलेज ऑफ इंजिीअरिंग, कराड येथे संपन्न झालेल्या आंतरमहाविद्यालयीन प्रकल्प स्पर्धे मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. 

 सिंहगड कॉलेज ऑफ इंजनिअरिंग मधील इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल तसेच वेगवेगळ्या सामाजिक अडचणीत मात करण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग कश्या प्रकारे करता येईल याचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले जाते याचेच फलित म्हणून तृतीय वर्षात शिकत असणाऱ्या अभिनव मुळे यांनी एका महत्त्वपूर्ण सामाजिक अडचणींवर मात म्हणून समाजातील महिला व भगिनिंसाठी सॅनिटरी नॅपकिन सहजासहजी हव्या त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्या करिता अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग करून एक अत्याधनिक sanitary Napkin Vending Machine ची निर्मिती केली. व सदरील प्रकल्पाचे सादरीकरण करून प्रथम पारितोषिक पटकावले. वरील उपलब्धि संबंधी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. या बरोबरच इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. व्ही. पी. मोरे, डॉ. बी. बी. गोडबोले यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad