*पंढरपूर सिंहगड मध्ये "राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा" संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रांगोळी, पोस्टर प्रेसेंटेशन आणि प्रोजेक्ट काॅम्पिंटेशन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात रांगोळी, पोस्टर प्रेसेंटेशन आणि प्रोजेक्ट काॅम्पिंटेशन या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या स्पर्धेत पंढरपूर परिसरातील असलेल्या शाळेतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेतील स्पर्धकांना महाविद्यालयाकडून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी बोलताना म्हणाले, राष्ट्रीय विज्ञान दिनाचं मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणं आणि त्यांना प्रेरित करणं आणि विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीबद्दल लोकांना जागृत करणं हा आहे. विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगानं पुढे जाऊ शकत नाही. विज्ञान गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रसिद्ध करण्यासोबतच देशातील नागरिकांना या क्षेत्रात संधी देऊन नवीन उंची गाठणे हा या विज्ञान दिनाचा मुख्य हेतु असल्याचे मत डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केले. यादरम्यान डॉ. संपत देशमुख सह मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ. अतुल आराध्ये, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. गणेश लकडे, प्रा. श्रीपाद घोंगडे, प्रा. समाधान माळी, प्रा. अभिजित सवासे, प्रा. पुनम गवळी, प्रा. निशा करांडे, प्रा. संध्या करांडे, प्रा. सर्जेराव महारनवर, संगिता कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.