सुसंवादासाठी मनाची एकाग्रता आवश्यक -शिक्षणतज्ञ डॉ.मोहन देशपांडे स्वेरीत ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम’चे उदघाटन

                                                                                                                              

सुसंवादासाठी मनाची एकाग्रता आवश्यक                                                         -शिक्षणतज्ञ डॉ.मोहन देशपांडे

स्वेरीत ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम’चे उदघाटन



पंढरपूर- ‘मूलभूत संवाद साधत असताना आपण आपल्या विचारांचे  चांगल्या रीतीने सादरीकरण केले पाहिजे. आयुष्यात पुढे जायचे असेल तर संभाषणात  लहान लहान चुका करणे टाळावे. अशा चुका टाळण्यातून योग्य काय आणि अयोग्य काय हे  समजून घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. कोणताही  मार्गदर्शनपर उपक्रम  असो अथवा वरिष्ठ सांगत असतील तर त्यांच्या सांगण्याकडे, सूचनेकडे एकाग्रपणे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे असते कारण आपण सामान्य माणूस नसून एक जबाबदार नागरिक आहोत. या पद्धतीने सर्वांनी वर्तन करणे गरजेचे आहे. आपल्यात बदल घडवण्यासाठी सर्वप्रथम मनाची संपूर्ण तयारी केली पाहिजे. यासाठी आपल्या कार्यात सुधारणा करणे अपेक्षित असून त्यात परफॉर्मन्स  दाखवता आला पाहिजे. आपल्या कार्यातील अडचणी सोडवण्यासाठी   सुसंवाद साधताना मनाची  एकाग्रता असणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ अभियंता डॉ.मोहन देशपांडे यांनी केले. 

       गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसी च्या पदवी व पदविका या चारही महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दि.२६ फेब्रुवारी २०२४ ते ०२ मार्च २०२४ दरम्यान आठवडाभर आयोजिलेल्या ‘अचीविंग प्रोफेशनल कंपेंटन्स विथ  कॉम्प्रेहेन्सिव्ह अप्रोच’ या विषयावर आयोजिलेल्या ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम’ मध्ये शिक्षणतज्ञ व अभियंता डॉ. मोहन देशपांडे मार्गदर्शन करत होते. संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर. आर. गिड्डे, रजिस्ट्रार आर.जी. झरकर यांच्या सहकार्याने आयोजिलेल्या या  कार्यशाळेत ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या मुख्य समन्वयिका प्रा. एम.एम. भोरे यांनी प्रास्तविकात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या कार्यशाळेची गरज का आहे हे सांगताना म्हणाल्या की, ‘विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असताना शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील शारीरिक व मानसिक क्षमता उत्तम राहावी यासाठी स्वेरीतर्फे दरवर्षी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रमांचे  आयोजन केले जाते. ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम’ हा देखील अशाच उपक्रमांचा एक भाग होय. ही कार्यशाळा आठवडाभर चालणार  असून याअंतर्गत सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात मार्गदर्शन कार्यक्रम होत आहेत’ असे सांगून सविस्तर माहिती दिली. पहिली बॅच २७ नोव्हेंबर २०२३ ते २ डिसेंबर २०२३ दरम्यान पार पडली. यामध्ये देखील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता. यातून उर्वरित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दुसऱ्या बॅचचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या बॅचच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात शिक्षणतज्ञ अभियंता डॉ.मोहन देशपांडे पुढे म्हणाले की ‘मी पुण्यामध्ये एका मोठ्या महाविद्यालयात मार्गदर्शन करताना स्वेरीची शिस्त व आदरयुक्त संस्कृती यांचे  त्यांना अनुकरण करण्यासाठी सूचना दिल्या. याचे कारण असे की, स्वेरीमध्ये पायाभूत शिस्त व आदरयुक्त संस्कृतीचे दर्शन दिसून येते जे इतरत्र दिसून येत नाही.’ असे सांगून त्यांनी ‘सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ हे पुस्तक वाचण्याचे आवाहन केले. त्यांनी सहा आंधळे व एक हत्तीची कहाणी, फ्रँकलिन रोसव्हेल्ट, विन्स्टन  चर्चिल, ऍडॉल्फ हिटलर यांची कहाणी सांगितली. एकूणच आपल्या कार्यात एकाग्रता हवी यासाठी मन, डोळे व कान हे महत्त्वाचे भाग  ठरतात. बॉडी लॅंग्वेज मधून कम्युनिकेशन साधण्याची कला अवगत करणे आवश्यक आहे. यामध्ये ९३ टक्के बॉडी लँग्वेज तर सात टक्के शब्दांचा वाटा असतो. चेहरा, डोळ्यांची हालचाल याद्वारे बॉडीची लँग्वेज अधिक जलद समजून येते.’ दुपारच्या सत्रात व्याख्याते नानासाहेब साठे यांनी ‘पॉवर ऑफ सबकॉन्शिअस माइंड’ या विषयावर मार्गदर्शन करताना ‘माणसे आजारी का पडतात? हास्य का दुर्मिळ होत चालले आहे? मानसिकता बदलण्यासाठी काय करावे? नोकरीच्या ठिकाणी आपले वर्तन कसे असावे? या व अशा विविध महत्वाच्या विषयावर माहिती दिली. ‘कोणतेही काम करताना त्यात झोकून काम केले पाहिजे. आपले स्किल अपडेट ठेवल्यास अधिक उत्साह जाणवत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. अभियंता मोहन देशपांडे आणि नानासाहेब साठे यांच्या मार्गदर्शनानंतर अनेक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रश्न विचारले त्यांची त्यांनी समाधानकारकपणे उत्तरे दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या  मार्गदर्शनाखाली स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी व पदविका मधील शिक्षकेतर कर्मचारी पदवी अभियांत्रिकीचे कार्यालयीन अधीक्षक एन.डी.ताडे, सह समन्वयक एस.सी.हलकुडे यांच्यासह इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad