मराठा समाजाला सरकारने हलक्यात येवू नये..
*अखिल भारतीय छावा संघटना युवक जिल्हाध्यक्ष प्रविण घाडगे पाटील यांचा इशारा* ..
प्रतिनिधी
मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा हा अनेक वर्षापासून सुरू आहे यासाठी माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील, मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील, वडजे साहेब, विनायक मेटे साहेब आणि मराठा समाजातील 150 च्या आसपास युवकांनी बलिदान दिले आहे.. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा उभा केला पण त्यांचे निधन झाल्यामुळे हा लढा पूर्ण होऊ शकला नाही आणि समाज पूर्णपणे शांत झाला त्या नंतर मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांनी पुन्हा आरक्षणाचा लढा उभा केला स्व:ता वर अनेक केसेस घेतल्या आणि लढा चालूच ठेवला त्याही वेळी शासनाने अण्णासाहेब जावळे पाटील यांना ही अनेक ऑफर देण्यात आल्या होत्या त्या ऑफर अण्णासाहेब जावळे पाटील यांनी धुडकावून लावल्या होत्या, समाजासाठी लढत असताना अण्णासाहेब जावळे पाटील यांचे पण निधन झाले आणि मराठा समाज पोरका झाला, अश्यावेळी समाजाला वाटले की आपला आरक्षणाचा लढा संपतो की अश्या वेळी मनोज जरांगे पाटील यांच्या सारख नेतृत्व मराठा समाजाला मिळाले . मनोज जरांगे पाटील यांनी समाजासाठी अनेक वेळा आमरण उपोषण करून सरकारला सळो की पळो करु सोडले आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून लढा अधिक तीव्र केला तसेच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मुळे महाराष्ट्रात जवळपास 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, परवा बोलत असताना मनोज दादा जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर शाब्दिक हल्ला केला त्याचे कारण की 16-17 दिवसाचे आंदोलन होय.
उपोषणामुळे त्यांची चिडचिड झाली असेल, शरीरातील सोडीयम कमी झाल्यामुळे त्यांच्या तोंडातून अपशब्द गेले असतील त्याची त्यांनी जाहीर माफी देखील मागितली आहे मात्र अश्यात ही सरकार कडून त्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केल्याला आरोपामुळे काल प्रविण दरेकर, आशिष शेलार यांनी विशेष तपास पथका मार्फत (एस आय टी) चौकशीची मागणी केली त्याला तात्काळ विधिमंडळात परवानगी देण्यासाठी जी धडपड करण्यात आली ती सांविधानिक 50% च्या आत ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केली असती तर, मराठा समाजाने सरकार आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे निश्चित आभार मानले असते मात्र त्यांनी तस न करता मनोज जंरागे पाटील यांच्यावर आरोप करीत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र सरकारने मनोज जंरागे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज आहे ही बाब सदैव लक्ष्यात ठेवावी, कटकारस्थान करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नयेत, सरकारने मनोज जंरागे पाटील यांच्याशी चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजे, त्यातून शांतपणे मार्ग काढला पाहिजे ही मराठा समाजाची मागणी असल्याचे प्रविण घाडगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे..