*पंढरपूर सिंहगड मध्ये "टेक्नोझील २के२४" उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील संगणक अभियांत्रिकी विभाग अंतर्गत, असोसिएशन ऑफ काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग स्टुडंट्स च्या वतीने, शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी "टेक्नोझील २के२४" चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
"टेक्नोझील २के२४" अंतर्गत संगणक अभियांत्रिकी विभागात कोडींग कॉम्पिटिशन,जी. यु.आय. कॉम्पिटिशन व अँड्रॉइड गेमिंग कॉम्पिटिशन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, संगणक अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. नामदेव सावंत, कार्यक्रम प्रमुख प्रा. सुमित इंगोले, विद्यार्थी प्रतिनिधी कु. गायत्री महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. नामदेव सावंत यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली .
स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानपत्र विभागातील प्राध्यापकांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुञसंचालन कु. दिशा होनमाने हिने तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन प्रा. सुमित इंगोले यांनी मानले.
"टेक्नोझील २के२४" हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.