*पंढरपूर सिंहगड मध्ये गेट परीक्षा या विषयावर व्याख्यान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात गेट प्रेपरेशन चॅलेंजेस अॅण्ड ऑप्युचुनिटीज फाॅर स्टुडंट्स या विषयावर क्रांती इंगळे यांचे व्याख्यान संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी क्रांती इंगळे यांचे गेट प्रेपरेशन चॅलेंजेस अॅण्ड ऑप्युचुनिटीज फाॅर स्टुडंट्स या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान महाविद्यालयाच्या वतीने क्रांती इंगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यामध्ये गेट प्रेपरेशन टिप्स, शाश्वत सामग्री व पुस्तके याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन क्रांती इंगळे यांनी केले.
हे व्याख्यान इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यान ७० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. वैभव गोडसे आदींसह इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.