विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा महत्वाचा वाटा- अनिल पाटील
लक्ष्मी दहिवडी येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार
लक्ष्मी दहिवडी: प्रतिनिधी
लहान वयात मुलांना सुसंस्कृत ज्ञान दान करण्याचे काम शिक्षक अतिशय उत्तम पद्धतीने करत आहेत. गावाच्या विकासाठी शिक्षकांचे योग्य खुप महत्वाचे आहे. शिक्षक हा तरुण पिढी घडविण्याचे काम करत आहेत. माझा विद्यार्थी भविष्यातील आवाहन पेलणारा तयार होऊन तो कोणत्याच क्षेत्रात कमी पडू नये यासाठी अतिशय उत्कृष्ट शिक्षण शिक्षक वर्ग देत आहेत. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे मत लक्ष्मी दहिवडीचे विद्यमान सरपंच अनिल पाटील यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केले.
पंचायत समिती शिक्षण विभाग मंगळवेढा यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार हे लक्ष्मी दहिवडीतील प्राथमिक शिक्षक रमेश हरी बनसोडे व दत्तात्रय शंकर बोबलते आणि शिक्षिका श्रीमती रुक्मिणी शेटे-पाटील, श्रीमती राजश्री बुगडे-लिगाडे यांना २४ फेब्रुवारी २०२५ रोजी गट शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला होता याच अनुषंगानेच लक्ष्मी दहिवडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत लक्ष्मी दहिवडी यांच्या वतीने रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा तसेच उद्योग रत्न म्हणून अनिल बाबुराव पाटील यांचा उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती वनिता बुरुकुल ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन लिगाडे यांनी केले. यादरम्यान अँड. शिवानंदन पाटील, ग्रामपंचायत सदस्य मोहन लिगाडे, गंगाधर मसरे, पुष्पककुमार सोनवले, बजरंग शिंगाडे, दत्तात्रय कोळेकर, सिद्धेश्वर पाटील, गजानन लिगाडे, श्रीमती वनिता बुरुकुल, डाॅ. प्रशांत पाटील, मच्छिंद्र सरगर, अर्जुन सोनवले, दिगंबर शिनगारे, अमोल सोनवले, राजकुमार मेटकुटे, धनंजय पाटील, स्वप्निल टाकळे, शिवाजी बनसोडे, शिवाजी पाटील, जगन्नाथ पाटील, प्रा. गौराबाई म्हमाणे आदींसह गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर शिनगारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. प्रशांत पाटील यांनी मानले.