सोशल मिडीयातून फसवणूक होऊ शकते- पोलीस उपनिरीक्षक सारीका शिंदे* *पंढरपूर सिंहगड मध्ये महिला सुरक्षिततेबाबत व्याख्यान*

 *सोशल मिडीयातून फसवणूक होऊ शकते- पोलीस उपनिरीक्षक सारीका शिंदे*

*पंढरपूर सिंहगड मध्ये महिला सुरक्षिततेबाबत व्याख्यान*



पंढरपूर: प्रतिनिधी


समाजामध्ये जीवन जगत असताना महिलांना येणारे अनुभव हे खुप वेगळे असतात. या मध्ये रॅगिंग सारखे प्रकार अनेकांना आयुष्यातून संपवून टाकतात. सद्या काळात रॅगिंगचे प्रमाणात पूर्वीपेक्षा खुप कमी झाले आहे. तरी सुद्धा कामांच्या ठिकाणी वरिष्ठांचा दबाव, फसवणूक अशा घटना आजही समाजात घडत आहेत. यासाठी महिलांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मोबाईल सारख्या माध्यमाच्या वापरातून मैञी निर्माण होते अन् याच मैत्रीतुन प्रेम प्रकरण घडत आहेत. यासाठी मोबाईल चा वापर सावधगिरीने वापरणे आवश्यक असून विनाकारण स्वतःचे फोटो इतरांना पाठवू नये. आईवडिलांच्या कष्टांचा विचार करून मुलीनी करिअरला प्राधान्य दिले पाहिजे. जर जाणीवपूर्वक कोणी ञास देत असेल तर तात्काळ निर्भया पथक अथवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सारीका शिंदे यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये विद्यार्थिनीना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.




    कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी  सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम आयोजित "महिला सुरक्षितता" याविषयावर पोलीस उपनिरीक्षक सारीका शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अंजली चांदणे, पोलीस उपनिरीक्षक सारिका शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश रोडगे, पोलीस नाईक विनोद काळे, पोलीस कॉन्स्टेबल विद्या पवार यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

    या कार्यक्रमात पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश रोगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम च्या चेअरमन प्रा. अंजली पिसे, प्रा. अंजली चांदणे, प्राजक्ता कुलकर्णी, सारिका नवले आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रद्धा पंधे व अनुष्का राऊत यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad