पंढरपूर सिंहगड मध्ये एप्लीकेशन्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित व्याख्यान संपन्न

पंढरपूर सिंहगड मध्ये एप्लीकेशन्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित व्याख्यान संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागातील द्वितीय वर्षातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शितल साखरे (आर्टिफिशल इंटेलिजन्स सोल्युशन आर्किटेक्ट अँड ट्रान्सफॉर्मेशन लीडर टी.सी.एस, पुणे) यांचे *ॲप्लिकेशन्स ऑफ आर्टिफिशल इंटेलिजन्स* या विषयावर दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागप्रमुख डॉक्टर सुभाष पिंगळे यांनी दिली.

कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानात विभाग प्रमुख डॉ.सुभाष पिंगळे प्रास्ताविक करताना म्हणाले की, शैक्षणिक सत्रामध्ये सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी आणि भविष्यात कंपनीच्या गरजा ओळखून कायम अद्ययावत राहण्यासाठी विविध कल्पकतेला वाव देणाऱ्या व्याख्यान, वेबिनार व कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयामधे नेहमीच केले जाते . 

या मार्गदर्शनामध्ये शितल साखरे यांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ॲप्लिकेशन्स कशा प्रकारे फायदेशीर आहेत हे उत्कृष्टरित्या समजावून सांगितले. तसेच त्यांनी समाजातील सध्याच्या समस्यांना टेक्निकल स्वरूपात सोलुशन देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसे आणि किती महत्वाचे आहे हे ही त्यांनी सांगितले. तसेच पुढील 20 ते 30 वर्षाच्या भविष्य काळामध्ये जोपर्यंत नवीन टेक्नॉलॉजी येत नाही तोपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग याला पर्याय नाही हे विद्यार्थ्यांना त्यांनी समजून सांगितले.

या व्याख्यानाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक शाम भीमदे यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad