उत्तर तालुक्याच्या विकासासाठी राजाभाऊ खरे यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही - तृप्ती खरे..

 उत्तर तालुक्याच्या विकासासाठी राजाभाऊ खरे यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही - तृप्ती खरे..



सध्या मोहोळ मतदारसंघात सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे नेते म्हणजे राजू खरे हे चित्र मोहोळ मतदारसंघात सर्वत्र भागात राजू खरे नावाचं एक वादळ निर्माण होताना दिसून येते मग त्यांच्या पाऊलावर पाऊल त्यांचा सुविध्य पत्नी तृप्ती ताई खरे यांनी देखील आता आम्हीही कुठे कमी नाही हे दाखवून देताना दिसून येत आहे, अस म्हंटल जात की एखाद्या कर्तृत्ववान पुरुषांच्या पाठीमागे महिलेचा हात असतो अगदी त्याचपद्धतीने उद्योजक राजू खरे यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी खंबीरपणे साथ देताना दिसून येते याचाच प्रत्यय म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन या गावात महिलांचा हळदी कुंकू समारंभ व गावातील भजनी मंडळास खरे यांच्या कुटुंबाकडून भजनीचे सर्व साहित्य देण्यात स्वखर्चाने देण्यात आले, या पार्श्वभूमीवर सौ.तृप्ती ताई खरे यांचे गावात जल्लोषात स्वागत करत गावातील मध्यवर्ती भागातील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त आरती करण्यात आली, त्यानंतर कार्यक्रमाठिकानी जाऊन प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करत सौ तृप्ती ताई खरे यांचे महिला गावकऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले,त्यानंतर उपस्थित असलेल्या काही मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या शौर्याचे पोवाडे भाषनाणे उपस्थित महिलांचे मने जिंकली,तसेच भजनी मंडळाच्या भजनाने संपुर्ण वातावरण भक्तिमय होताना दिसून येत होते यानंतर सौ तृप्ती ताई खरे यांनी आपले विचार मांडत गावातील महिलांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेतला या कार्यक्रमाला मात्र महिलांच्या उपस्थित मोठ्या प्रमाणत असून येणाऱ्या काळात खरे यांच्या पाठीशी राहण्याचे देखील सांगितले गेले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad