*पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेजचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन*
२३ ते २९ जानेवारी दरम्यान होणार शिबिर-प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांची माहिती
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचे संयुक्त विद्यमानाने आष्टी (ता. मोहोळ) येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मंगळवार दिनांक २३ ते २९ जानेवारी २०२४ या कालावधीत विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर आष्टी (ता. मोहोळ) येथे विविध उपक्रम राबवून संपन्न होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांनी दिली.
या शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, सरपंच डाॅ.आमित व्यवहारे, उपसरपंच निखिल गुंड, प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी, ग्रामविकास अधिकारी श्री.दिपक शेळके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री.काकासहेब गुंड-पाटील मा. सरपंच ग्रा.पं. आष्टी श्री.महादेव (आण्णा) व्यवहारे, नूतन विद्यालय प्रशाला आष्टीचे मुख्याध्यापक श्री.हेरले सर यासह
एनएसएस क्लबचे प्रेसिडेंट
नागेंद्रकुमार नायकुडे आदी हस्ते संत गाडगे महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या शिबिरात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, सरपंच डाॅ.आमित व्यवहारे, उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी, कार्यक्रमाधिकारी प्रा.चंद्रकांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तज्ञ व अनुभवी वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे. दैनंदिन श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. याशिवाय जैविक तंत्रज्ञान याविषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख,प्रा. सुमित इंगोले रासेयो समन्वयक प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. अजित करांडे, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, सह एनएसएस क्लब सेक्रेटरी अथर्व कुराडे विभागीय विद्यार्थी प्रतिनिधी नाना वाघमारे,के. टी. नरळे, ए .ए. चौगुले, एस. के. पांधे, ए. बी. नायकल, पी. एम. रुपनर, टी. एस. खाांडेकर, सी. एल. मासाळ, एस. डी. आसबे,आर. एम .पठाण, एस. पी. कापले, व्ही. व्ही. कंडरे, एच. एच. शिंदे, एस. व्ही. अवताडे, पी. डी. देवराम, एस. ए. भिवरे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामपंचायत आष्टी सह ग्रामस्थ परीश्रम घेणार आहेत.