स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे मुंढेवाडीमध्ये उदघाटन



स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे मुंढेवाडीमध्ये उदघाटन


आठवडाभर चालणार विविध उपक्रम



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.२२ जानेवारी २०२४ पासून ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंढेवाडी (ता. पंढरपूर) मध्ये ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे आयोजन केले असून ‘युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास’ हे या शिबिराचे ब्रीदवाक्य आहे. या श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन मुंढेवाडीचे सरपंच हणमंत घाडगे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

          स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती यांच्या नेतृत्वाखाली व कार्यक्रम अधिकारी प्रा. रविकांत साठे, डॉ. धनंजय चौधरी व डॉ. एम. एम. अवताडे यांच्या समन्वयातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील जवळपास २०० विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. हे शिबिर आठवडाभर चालणार असून या शिबिरांतर्गत विविध उपक्रम होणार आहेत. या शिबिरामध्ये श्रमदान, चित्रकला, निबंध स्पर्धा, वृक्ष लागवड, मतदार जनजागृती, पर्यावरणाचा विकास, महिला आरोग्य विषयक समस्या व उपाय, शिक्षण, स्वच्छता अभियान आदी विषयांवर प्रबोधन व मार्गदर्शन होणार आहे. संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरवात झाली. स्वेरी अभियांत्रिकीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी प्रास्तविकात ‘मुंढेवाडी मध्ये ‘विशेष श्रमसंस्कार शिबिर’ आयोजित करण्याचा हेतू स्पष्ट केला. उदघाटन प्रसंगी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की ‘विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी हा परिपूर्ण घडत असतो. श्रमसंस्काराच्या माध्यमातून विद्यार्थी व त्यांचे राहणीमान, संस्कार, वर्तन, माणुसकी, यात बदल होतो व व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी योग्य संधी मिळते. हेच संस्कार विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये करिअर करण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. त्याचबरोबर मुंढेवाडी आणि स्वेरी यांचे असे नाते अतिशय आत्मियतेचे आहे.’ असे प्रतिपादन केले. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुदाम मोरे यांनी ‘स्वेरीच्या विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या जनजागृती मुळे गावात एक उर्जा निर्माण होत असते. गेल्यावेळी त्यांनी संपूर्ण मुंढेवाडी गावात शिक्षण, स्वच्छता, आरोग्य यासारख्या अनेक विषयावर प्रबोधन केल्याचे सांगून स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य अप्रतिम होत असल्याचे आवर्जून सांगितले. सात दिवस स्वेरीचे विद्यार्थी हे गावामध्ये स्वच्छता, श्रमदान या बरोबरच बालविवाह निर्मूलन, मतदार जनजागृती, जल व्यवस्थापन, पर्यावरण जनजागृती, कचरा व्यवस्थापन यावर देखील कार्य करणार आहेत. यावेळी उदघाटन प्रसंगी उपसरपंच सौ. रेखा अभिमान मोरे, पांडुरंग सह. सा. कारखाना, श्रीपूरचे संचालक सुदाम बापु मोरे, पोलीस पाटील सौ. राणी शरद मोरे, माजी सरपंच पांडुरंग मोरे, हनुमंत शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष आण्णासाहेब मोरे, तंटामुक्तीचे सचिन रामचंद्र मोरे, भास्कर मोरे, सिद्धेश्वर मोरे, मधुकर मोरे, जि.प.प्रा. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र डुबल, श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक भारत खिलारे, तलाठी मुसाक काझी, ग्रामसेवक बालाजी एलेवाड, माजी सैनिक ज्योती नाना मोरे, दगडू तात्या मोरे, भारत मोरे, तानाजी मोरे यांच्यासह मुंढेवाडीतील ग्रामस्थ तसेच स्वेरी अभियांत्रिकीचे प्रा. के.एस.पुकाळे, प्रा. एस.बी.खडके, प्रा. बी.टी. गडदे, प्रा.जी.जी. फलमारी, प्रा.सौ. पी. व्ही. पडवळे, प्रा. मेघा सोनटक्के व इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पिसे यांनी केले तर डॉ. यशपाल खेडकर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad