मकर संक्रांती निमित्ताने हळदी कुंकूच्या कार्यक्रमास पोहोरगाव व विटे येथे महिला भगिनींनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद!* *महिला भगिनींच्या कोणते ही आडेअडचणी असतील तर आमच्या पर्यंत पोहचवा नक्की सोडवू: सौ.तृप्तीताई खरे*

 *मकर संक्रांती निमित्ताने हळदी कुंकूच्या कार्यक्रमास पोहोरगाव व विटे येथे महिला भगिनींनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद!*



 *महिला भगिनींच्या कोणते ही आडेअडचणी असतील तर आमच्या पर्यंत पोहचवा नक्की सोडवू: सौ.तृप्तीताई खरे*





२४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या पत्नी सौ. तृप्तीताई राजु खरे यांच्या उपस्थितीत मकर संक्रांतीनिमित्त मोहोळ मतदार संघातील विविध गावात हळदी कुंकू कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील पॅटर्न आता मोहोळ मतदार संघातही सुरू करण्यात आला आहे.


विधानसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत. यामुळे या मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघातून उमेदवार म्हणून इच्छुक असलेले उद्योजक राजाभाऊ खरे यांनीही आपला संपर्क वाढविण्यास मोठा जोर धरला आहे. विविध कार्यक्रमाचे निमित्ताने खरे गावोगावी भेटी आणि मदतकार्य सुरूच आहे. अशातच मागील काही दिवसांपासून त्यांच्या पत्नी तृप्तिताई खरे आणि लहान बंधू विजय खरे यांनीही आपले गवभेटीसाठी दौरे वाढविले आहेत. यामुळे खरे यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे.

मागील दोन दिवसांपासून हळदी कुंकू कार्यक्रम सुरू केले आहेत.यामधे मोहोळ मतदार संघातील असलेल्या पोहोरगाव व विटे येथे महिलाच्या वतीने तृप्तीताई यांचा सत्कार करण्यात आला .

     


 “गुळाची गोडी त्याला तिळाची जोडी, नात्यांचा गंध त्याला स्नेहाचा बंध

मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा, ऋणानुबंध वाढवण्याचा स्नेहाचा बंध 

मग नववर्षातील या पहिल्या सणानिमित्त सार्‍या एकत्र येऊन


साजरा करू सोहळा खास हळदी कुंकवाचा



या प्रसंगी मा.सौ.तृपतीताई खरे,माजी सभापती(सांगोला)-मा.सुर्यागनताई मॅडम,विद्यमान सरपंच-मा.सौ. हिरकणीताई भारत वाघमारे,मा.सौ.कमळाबाई, मा.सौ.तृप्तीताई खरे मॅडम,माजी सभापती(सांगोला)-मा.सुर्यागनताई मॅडम,विद्यमान उपसरपंच- मा.सौ.सखुबाई शंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्या-मा.सौ.रूपालीताई नाना कोळी,बचत गट अध्यक्ष -मा.सौ.सुनिता नंदू जाधव आदी गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad