स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या कंपनी सोबत सामंजस्य करार


स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या कंपनी सोबत सामंजस्य करार



पंढरपूर: ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा पुणे येथील ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीची २००० कोटींच्या वर उलाढाल आहे. या बीव्हीजी उद्योग समुहाच्या विविध क्षेत्रात सध्या ७० हजार पेक्षा जास्त कर्मचारी नोकरी करतात. प्रायोरिटी प्लेसमेंट पार्टनर म्हणून स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. 

        यावेळी बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड म्हणाले की, ‘विविध कौशल्यप्राप्त भारतीय युवक युवतींना जगभरातून मागणी वाढत आहे. युवकांनी नियमित अभ्यासक्रमासोबतच जागतिक मागणीप्रमाणे छोटे छोटे कॉर्सेस करुन स्वतःला अद्ययावत ठेऊन या संधीचा फायदा घेणे गरजेचे आहे. या प्रक्रियेमध्ये बीव्हीजी इंडिया लिमिटेड आपणास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे. जगात सर्वात युवा असलेल्या आपल्या देशातील युवकांना कौशल्ययुक्त सेवेच्या माध्यमातून जगावर ठसा उमटविण्याची अनोखी संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी उद्योग व महाविद्यालयांनी एकत्रित आले पाहिजे व याचाच एक भाग म्हणून बीव्हीजी राज्यातील शंभराहून अधिक महाविद्यालये व विद्यापीठांशी "प्रायोरिटी प्लेसमेंट पार्टनर" हा सहकार्य करार करत आहे’ असेही ते म्हणाले. ग्लोबल प्रेसिडेंट रूपल सिन्हा यांनी यावेळी जागतिक पातळीवरील उपलब्ध संधी व युवकांमधील कौशल्ये यामधील अंतर या बाबींचे महत्त्व अधोरेखित केले. संचालिका सौ. वैशाली गायकवाड यांनी कंपनीच्या कार्यसंस्कृतीची ओळख करुन दिली. मनुष्यबळ व्यवस्थापन प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी समूह कंपन्यांची विविध पदे व त्या पदांची निवड प्रक्रिया याविषयी माहिती दिली तर अप्रेंटिस विभागप्रमुख रवी घाटे यांनी केंद्र शासनाच्या विविध अप्रेंटिस योजनांची व त्यातून कॉलेजेस व उद्योगांना मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली. या सामंजस्य करारारावर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे यांनी स्वाक्षरी केली. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा हा करार करण्यात आल्याबद्धल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इनचार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad