*पंढरपूर सिंहगड मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शुक्रवार दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, प्रा. अभिजित सवासे, प्राजक्ता कुलकर्णी आदीच्या हस्ते दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
राजमाता जिजाऊ त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या तसेच स्वामी विवेकानंद हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून देण्यात स्वारी विवेकानंद यांची प्रमुख भुमिका होती.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये संयुक्त साजरी करण्यात आली. यादरम्यान डाॅ. दिपक गानमोटे, प्रा. समाधान माळी, सिद्धेश्वर लवटे, संजय बनकर, योगेश नवले, सारीका नवले, नवनाथ माळी, श्रीकृष्ण आवताडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.