एमबीए व एमसीए च्या सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

                                                                                       


‘एमबीए व एमसीए च्या सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू


स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा



पंढरपूर– शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए व एमसीए प्रवेशाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या  एमबीए-सीईटी २०२४  या प्रवेश परीक्षेसाठी  ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जानेवारी २०२४ पासून ते बुधवार, दि.३१ जानेवारी २०२४ पर्यंत आणि एमसीए-सीईटी- २०२४ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जानेवारी २०२४ पासून ते गुरुवार, दि.०१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. पदवी उत्तीर्ण झालेल्या व पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएएच एमबीए-सीईटी २०२४ व एमएएच एमसीए-सीईटी २०२४ साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरीतील एमबीए व एमसीए विभागात उपलब्ध करण्यात आली  आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

         पदव्युत्तर पदवी असलेल्या एमबीए च्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजली जाणारी एमएएच-एमबीए-सीईटी २०२४ ही परीक्षा शासनाच्या दिलेल्या वेळापत्रकानुसार साधारण ९/१० मार्च या दोन दिवशी होणार आहे. तर एमएएच-एमसीए-सीईटी २०२४ ही परीक्षा साधारण १४ मार्च २०२४ च्या दरम्यान होणार आहे. एकूणच एमबीए व एमसीएच्या या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जानेवारी २०२४ पासून ते गुरुवार, दि.०१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालणार आहे. या प्रवेश परीक्षेच्या संदर्भात अधिक माहीतीसाठी शासनाच्या https://mbacet2023.mahacet.org या संकेत स्थळावर तसेच स्वेरी अभियांत्रिकीच्या एमबीएचे विभागप्रमुख प्रा.करण पाटील (मोबा. नंबर–९५९५९२११५४) व एमसीएचे विभागप्रमुख प्रा.मनसब शेख (९०२८९०७३६७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad