*सोशल मिडीयामुळे घराघरात अबोला निर्माण झाला आहे. प्रा. प्रविण दवणे*
पंढरपूर सिंहगड मध्ये प्रा. प्रविण दवणे यांचे व्याख्यान संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
सद्या सुर शोधण्याचे दिवस आहे. मी कोण आहे हे शोधले पाहिजे. सुंदर काही करायचे असेल तर मुहुर्त असतोच. वाईट काही करायचं असेल तर मुहुर्त नसतो. जीवनात कलेचा स्पर्श आवश्यक आहे. ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करा. अपमानाने माणुस घडत असतो. सोशल मिडीयांचा वापर अतिरिक्त होत आहे. यामुळे घराघरात अबोला निर्माण होत आहे. माणसाच्या नात्यांमध्ये गंध दिसत नाही. घराघरात मार्गदर्शन बंद झाले आहे. सोशल मिडीयामुळे माणुस बधिर होत आहे. मोबाईल एक काडेपेटी आहे. त्याचा योग्य वापर करा. संशोधन वृत्ती असणे आवश्यक आहे ते संशोधन समाजाला उपयोग असावे. स्वातंत्र्य नंतर आज ही आपण पारतंत्र्यात जगत आहोत. मनुत्वाचा विकास म्हणजे शिक्षण. आयुष्यात संकटात येत असतात त्याच संकटाचे संधीत रूपांतर करा. माणुस घडावा यासाठी सिंहगड संस्था प्रयत्न करत असुन सोशल मिडीयातमुळे वाचन संस्कृती व माणसामाणसांतील संवाद कमी होत असल्याचे मत प्रा. प्रविण दवणे यांनी बोलताना व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये बुधवार दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी "दीपस्तंभ मनातले जनातले" या विषयावर सुप्रसिद्ध कवी, लेखक व व्याख्याते प्रविण दवणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाची सुरुवात प्रा. प्रविण दवणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, अशिश शहा, डिंपल शहा यांच्या हस्ते सरस्वती पुजन करून दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे प्रा. प्रविण दवणे यांचा परिचय उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यादरम्यान डिंपल शहा व अशिश शहा यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास पालवी संस्थेच्या संस्थापक मंगलाताई शहा उपस्थित होत्या. पालवी संस्कार सेतु संस्कार-विचार-राष्ट्रनिर्माण द्वारा व पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रृती दिवटे हिने तर उपस्थितांचे आभार प्रा. अभिजित सवासे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.