पंढरपूर सिंहगड मध्ये लालबहादूर शास्ञी यांना अभिवादन*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये लालबहादूर शास्ञी यांना अभिवादन*



पंढरपूर: प्रतिनिधी 


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये गुरुवार दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी थोर स्वातंत्र्यसेनानी लालबहादूर शास्ञी यांचा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   यादरम्यान लालबहादूर शास्ञी यांच्या प्रतिमेस प्राचार्य डाॅ. कैलाश करांडा, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चैतन पिसे, डाॅ. शाम कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख, प्रा. अनिल निकम, प्रा. समाधान माळी यांच्या उपस्थिती दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

   लाल बहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनित लाल बहादूर शास्त्री यांचे महत्त्व लक्षात आले होते. १९४६ मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा या “छोटया डायनॅमो”ला देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यात आले. त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरुढ झाले. त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तर प्रदेशात एक लोकोक्ती बनली. असे महान व्यक्तिमत्त्व असलेले लालबहादूर शास्ञी यांचा स्मृतिदिनान पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये साजरा करण्यात आला.

 पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात लालबहादूर शास्ञी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिद्धेश्वर लवटे, संजय बनकर, पांडूरंग परचंडे, विशाल म्हेञे, श्रीकृष्ण आवताडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad