विद्यापीठ स्तरीय ‘अविष्कार २०२३’ या स्पर्धेत स्वेरीचे चार विद्यार्थी यशस्वी


विद्यापीठ स्तरीय ‘अविष्कार २०२३’ या स्पर्धेत स्वेरीचे चार विद्यार्थी यशस्वी



पंढरपूर– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तर्फे विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘अविष्कार- २०२३’ या संशोधन स्पर्धेत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व कॉलेज ऑफ फार्मसी मधील एकूण चार विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. या यशामुळे स्वेरीतील संशोधन विभागाला अजून बळकटी आली आहे तसेच या यशामुळे पंढरपूर पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

        पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तर्फे प्रत्येक वर्षी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांसाठी ‘अविष्कार संशोधन महोत्सव’ हा स्पर्धात्मक संशोधन उपक्रम राबविला जातो. यंदा हा ‘अविष्कार महोत्सव’ सोलापूर विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. इंजिनिअरींग मधील पदवी विभागासाठी असलेल्या ‘अॅग्रीकल्चर, अॅनिमल अँड हजबंडरी’ या विषयात प्रांजली मिलिंद उत्पात यांनी प्रथम क्रमांक व रोहन काकासाहेब चौगुले यांनी तिसरा क्रमांक पटकावला. प्रांजली उत्पात यांनी ‘सोलर बेस्ड अॅटोमेटीक पेट फिडर’ या विषयावर तर रोहन चौगुले यांनी ‘अॅग्रीकल्चर स्प्रेइंग ड्रोन’ या विषयावर सादरीकरण केले होते. फार्मसी विभागातून कीर्ती कालिदास महामुनी यांनी पदव्युत्तर पदवी विभागासाठी असलेल्या ‘मेडिसिन अँड फार्मसी’ या विभागात दुसरा क्रमांक पटकाविला तर पूजा मुथ्यम्सराज बत्तुल यांनी पदवी विभागासाठी असलेल्या ‘मेडिसिन अँड फार्मसी’ स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला. कीर्ती महामुनी यांनी ‘एन अॅटोमेटीक अॅपरटस फॉर मेजरमेंट ऑफ अँगल ऑफ फिफ्युज टू डेटरमाइन फ्लोबिलीटी ऑफ ग्रेनल्स’ या विषयावर सादरीकरण केले होते तर पूजा बत्तुल यांनी 'फॉर्म्युलेशन अँड इव्याल्यूएशन ऑफ फास्ट डिझाइंटग्रेटींग टॅब्लेट्स फॉर कार वायिंडशिल्ड' या विषयावर सादरीकरण केले होते. स्वेरीच्या अभियांत्रिकी व फार्मसीच्या या चारही यशस्वी विद्यार्थ्यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या अविष्कार स्पर्धेत स्वेरीकडे चार पुरस्कार आल्यामुळे स्वेरीतील संशोधन विभागाला आणखी बळकटी मिळाली असून येत्या काळात विद्यार्थ्यांमधील संशोधन क्षमता अधिक वाढीस लागणार, हे मात्र निश्चित. विद्यापीठ स्तरीय या स्पर्धेत यश मिळाल्यामुळे हे यशस्वी विद्यार्थी पुढील आठवड्यात नाशिकमध्ये होणाऱ्या ‘राज्यस्तरीय अविष्कार संशोधन’ स्पर्धेत संशोधन प्रकल्प सादर करणार आहेत. या गुणवंतांना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरीच्या अविष्कारच्या समन्वयक डॉ.एम.एम.आवताडे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, प्रा.एस.एस.गावडे तसेच फार्मसीचे डॉ. वृणाल मोरे व डॉ. प्राजक्ता खुळे यांचे मार्गदर्शन लाभले. ‘अविष्कार २०२३’ मधील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, संशोधन अधिष्ठाता डॉ.अमरजित केने, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, स्वेरीचे रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad