*पंढरपूर सिंहगड "सृजनरंग नियतकालिकेतील" लेखन साहित्याला प्रथम क्रमांक*
पंढरपूर: प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे मंगळवार दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी नियतकालिक स्पर्धा २०२२-२३ मधील पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील लेखन साहित्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ कवी प्रा. इंद्रजित भालेराव म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रभारी कुलगुरु प्रा. डाॅ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, डाॅ. केदारनाथ काळवणे उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नियतकालिक स्पर्धेत कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेली कुमारी अनुजा पाटील हिला हिंदी ललित गद्यात्म लेखनास प्रथम क्रमांक आणि स्नेहल कुंभार हिला मराठी वैचारिक लेखन साहित्यिकास प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर पारितोषिक हे विद्यापीठाचे कुलसचिव योगिनी घारे, प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते कुमारी स्नेहल कुंभार, डाॅ. संपत देशमुख व प्रा. अभिजित सवासे यांनी स्विकारले.
पारितोषिक प्राप्त केलेल्या कुमारी स्नेहल कुंभार आणि कुमारी अनुजा पाटील यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. चेतन पिसे, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. अतुल आराध्ये, डॉ. समीर कटेकर आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.