गडचिरोली जिल्हयात मोठया प्रमाणात खनिज साधन संपत्ती असल्याने औद्योगिक क्षेत्रात गडचिरोली जिल्हाच्या विकासाला चालना मिळेल*.... *खासदार अशोक नेते.*

 *गडचिरोली जिल्हयात मोठया प्रमाणात खनिज साधन संपत्ती असल्याने औद्योगिक क्षेत्रात गडचिरोली जिल्हाच्या विकासाला चालना मिळेल*....

*खासदार अशोक नेते.*



गडचिरोली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्रीडा महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून विदर्भातील चांगल्‍या खेळाडूंनी समोर आणले असून आता संपूर्ण देशात क्रीडा महोत्‍सवांचे आयोजन केले जात आहे. आता त्‍यांनी ‘खासदार औद्यागिक महोत्‍सव-अॅडव्‍हांटेज विदर्भ’च्‍या माध्‍यमातून विदर्भातील उद्योगांना प्रोत्‍साह‍ित करण्‍याचे महत्‍वाचे पाऊल उचलले आहे. नवीन वर्षात त्‍यांनी उद्योगांना या माध्‍यमातून नवी दिशा दिली असून त्‍यामुळे विदर्भात उद्योजक आणि युवकांमध्‍ये नवी चेतना निर्माण होईल, असा आशावाद गडचिरोली चिमूर लोकसभेचे खासदार अशोक ‌नेते यांनी व्‍यक्‍त केला. 

पुढे बोलतांना खा.अशोक नेते यांनी गडचिरोली ज‍िल्‍ह्यात नैसर्गिक साधनसंपत्‍ती मुबलक प्रमाणात असून केवळ पायाभूत सुविधांच्‍या अभावामुळे येथे उद्योग येऊ शकले नाही, अशी खंत व्‍यक्‍त करताना अॅडव्‍हांटेज विदर्भचा लाभ गडचिरोली जिल्‍ह्याला म‍िळेल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.


केंद्रीय मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आकाराला आलेल्‍या असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट (एड) च्‍या वतीने येत्‍या 27 ते 29 जानेवारी 2024 दरम्‍यान ‘खासदार औद्योग‍िक महोत्‍सव – अॅडव्‍हांटेज विदर्भ’ चे राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरात आयोजन होणार असून या महोत्‍सवाच्‍या स्‍थळाचे भूमिपूजन बुधवारी थाटात पार पडले. 

याप्रसंगी वर्धेचे खा.रामदास तडस, रामटेकचे खा. कृपाल तुमाने, आ. मोहन मते यांच्यासह वर्ल्‍ड ट्रेड सेंटरचे अनुप खंडेलवाल, बैद्यनाथचे सुरेश शर्मा, शारदा इस्‍पात लि. चे नंदक‍िशोर सारडा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, माजी महापौर कल्‍पना पांडे, गोविंद देहडकर यांच्‍यासह औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्‍यवर प्रामुख्याने उपस्थित होते.


जिल्हा प्रतिनिधि:- अमान क़ुरैशी

तेज महाराष्ट्र वार्ता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad