भीमाचा काटा चोख हाय..; वैधमापन विभागाच्या अचानक तपासणीत शिक्कामोर्तब* *शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र.. भीमाचा काटा चोख हे समृद्धीचं सूत्र*


*भीमाचा काटा चोख हाय..; वैधमापन विभागाच्या अचानक तपासणीत शिक्कामोर्तब*


*शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र.. भीमाचा काटा चोख हे समृद्धीचं सूत्र*


*भीमाचा काटा चोख.. शेतकरी म्हणतात 'माझा ऊस भीमालाच'*


*भीमाच्या काट्यात एक किलोचा फरक नाय; वैधमापन विभागाच्या अचानक तपासणीत स्पष्ट*



भीमा सहकारी साखर कारखान्याच्या काट्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास आहे. या विश्वासाला तडा जावू न देता आजच्या वजनकाटा तपासणीने विश्वासार्हता  वाढली आहे. वैद्यमापन पथकाने कारखान्याकडील काट्याची तपासणी करत एकच वाहन तीन काट्यावर फिरवून वजन केले. त्यामध्ये किंचितही फरक आढळून आला नाही. यानंतर काट्यावर २० किलोची प्रमाणित वजने ठेवून प्रत्यक्ष वजन केले असता सुद्धा वजनात कोणताही फरक आढळून आला नाही. 

संपूर्ण राज्यात अनेक कारखान्यांकडून सर्रास काटा मारण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून केला जातो. राज्यात काट्याबद्दल असं अनागोंदीच चित्र असताना राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याबद्दल गत दहा वर्षांत एकाही सभासदाची तक्रार आलेली नाही. खासदार महाडिक यांनी बाहेरील काट्यावर वजन करून आणण्यासाठी ऊस उत्पादकांना परवानगी तर दिली आहेच पण सोबत भीमाच्या काट्यात एक किलोचा जरी फरक आढळला तर एक लाख रुपयांचं बक्षीस यांनी जाहीर केलं आहे. ऊस दराच्या स्पर्धेत चोख काट्यासह ऊस उत्पादकांचा विश्वास जपत, गाळपास आलेल्या ऊसाची पहिली उचल देखील १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्यानेच शेतकरी सुद्धा यावर्षी 'माझा ऊस भीमालाच' असं म्हणत आहेत.

 


वैद्यमापन तपासणी पथकामध्ये पुरवठा निरीक्षक पी. एच. मगर, उप नियंत्रक अ. ध. गेटमे  यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी अप्पासाहेब अश्रुभान येळे उपस्थित होते. तपासणी वेळी कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, व्हाईस चेअरमन सतिश जगताप यांच्यासह संचालक, सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.



कोट :


'भीमाचा काटा चोख आहे' हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास आजच्या काटा तपासणीने पुन्हा एकदा सिध्द झाला आहे. कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हिताला प्राधान्य दिले आहे. भीमा कारखान्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये चोख काटा असणारा कारखाना म्हणून नाव लौकीक मिळविला आहे.

सूर्यकांत शिंदे

कार्यकारी संचालक.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad