एन.पी.टी.इ.एल. परीक्षेत स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे यश प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

                                                                                                                 

एन.पी.टी.इ.एल. परीक्षेत स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे यश

प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग




पंढरपूर- एनपीटीइएल अर्थात 'नॅशनल प्रोग्राम फॉर टेक्नोलॉजी एन्हांस्ड लर्निंग' हा तंत्रज्ञानाशी संबंधित व शिक्षणविषयक राष्ट्रीय उपक्रम आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाद्वारे अर्थसहाय्य  केला जाणारा उपक्रम असून सर्व आय.आय.टी. च्या समन्वयातून प्रत्यक्षात आलेला आहे. भारत सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम २००३ पासून सुरु करण्यात आलेला असून यामध्ये जवळपास ७ आय.आय.टी. चे  प्राध्यापक वर्ग, तसेच इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सच्या प्राध्यापकांनी मिळून विविध विषयांवर आधारित अनेक ऑनलाइन कोर्सेस तयार केलेले आहेत. 

          या उपक्रमांतर्गत तज्ञ प्राध्यापकांकडून विविध शैक्षणिक क्षेत्रांतील अभ्यासकम ऑनलाईन प्रणालीद्वारे  सादर केले जातात. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी या कोर्सेस मधून मोठ्या प्रमाणावर हातभार लागत असतो. हे कोर्सेस शिकून झाल्यावर त्या ठराविक कोर्स वर आधारित एक परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा देखील ऑनलाईन माध्यमातूनच घेण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांच्या माध्यमातून विविध प्रकारचे रँकिंग दिले जाते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी मधील शिक्षक व विद्यार्थी असे नवनवीन कोर्सेस पूर्ण करत असतात. स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारे  सोहेल मनसब सय्यद यांना सर्टिफिकेटच्या माध्यमातून इलाईट आणि सुवर्ण पदक मिळाले तर प्रिती यशवंत तावशे यांना इलाईट आणि रौप्यपदक मिळाले. याशिवाय  प्रा.सुजित इनामदार, प्रा. मनोज देशमुख, प्रा. स्मिता गावडे, प्रा.मेघा सोनटक्के यांना इलाईट आणि रौप्य पदक तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या प्रमुख डॉ.मिनाक्षी पवार, प्रा.ज्योती शिंदे, प्रा.सीमा आटोळे, प्रा.महुआ बिस्वास, प्रा.सचिन इंदलकर, प्रा.जीवन मुसळे व प्रा.सागर वाघचवरे यांना ‘इलाईट’ प्रमाणपत्रे मिळाली आहेत. सर्व यशस्वी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.


छायाचित्र- स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह, सोहेल सय्यद व प्रिती तावशे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad