लोह्यातील इंदिरा नगर भागातील मराठा बांधवांनी ८१ व्या दिवशी मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणानात उत्स्फुर्त सहभाग नोंदवला

 लोह्यातील इंदिरा नगर भागातील मराठा बांधवांनी ८१ व्या दिवशी मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणानात उत्स्फुर्त सहभाग नोंदवला 

 लोहा(शुभम उत्तरवार) 

    लोहा  येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चालू असलेल्या साखळी उपोषणात आज दि.(५) डिसेंबर रोजी इंदिरा नगर भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा बांधवांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.


    गेल्या अनेक दिवसांपासून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाण पत्र देऊन त्यांचा समावेश स्वतंत्र पणे ओबीसी मध्ये करण्यात यावा या मागणीसाठी इंदिरा नगर लोहा येथुल मराठा समाजातील बांधव साखळी उपोषण करत आहेत.आज उपोषणाचा ८१ वा दिवस आहे.

       आज दि.(५) डिसेंबर रोजी लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात, मोठ्या संख्येने सहभागी होऊन जरांगे पाटील यांना व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर   हिरिरीने समोर येवून सरकारच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या आरक्षणाच्या साखळी आंदोलनात सहभाग नोंदविला.यावेळीइंदिरा नगर येथील सकल मराठा बांधव

अशोक पाटिल पवार ,भीमराव पाटिल जाधव ,अंबादास पाटिल पवार,राम पाटिल काळे ,सचिन पवार,वसंत पवार, ब्रम्हानंद पवार, राजेश कुटे, माधव गायकवाड़,चंद्रकांत कंधारे,

नवनाथ शिंदे,विठ्ठल टोणगे, कृष्णा पवार, दत्ता पवार, चंद्रकांत शिंदे, कृष्णा शिंदे गजानन टरके,बाळु कदम, दत्ता बुद्रुक,संग्राम पातळे,कचरु पौळ,कैलास सुर्यंवशी,ज्ञानेश्वर जाधव, विठ्ठल गायखर, वशिष्ठ आईनवाडिकर ,राजेश चव्हाण, संभाजी चव्हाण लक्ष्मण तिडके आदींनी सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad