*पंढरपूर सिंहगड मध्ये महापरिनिर्वाण दिवस साजरा*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये बुधवार दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी महाविद्यालयाचे संवेदनशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणजे महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.
महापरिनिर्वाण दिवसानिमित्त एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, पब्लिकेशन्स डीन डॉ. संपत देशमुख, इस्टेट मॅनेजर प्रा. रोहन नवले, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. श्रीगणेश कदम, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. भालचंद्र गोडबोले आदींच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
आधुनिक भारताच्या इतिहासात गुलामगिरी निर्मुलनाच्या लढ्यात अग्रभागी लिहले जाते, दास्यात असणाऱ्या मुक्या मानव प्राण्यांमध्ये नव्या चैतन्याची फूंकर मारणाऱ्या बाबासाहेबांचे नांव अब्राइम लिंकन, वाशिंग्टन, मार्टिन ल्युथर, नेल्सन मंडेला अशा दास्यविमोचनार्थ लढणाऱ्या महापुरुषांच्या ओळीत जाऊन ठाकले आहे.
स्त्रीहक्कांसाठी लिहलेले कायदे,त्यांचे विचार आणि तत्वे फक्त भारतातील स्त्री-पुरुष यांच्यासाठीच नाही तर संपूर्ण जगातील व्यक्तीसाठी दिशादर्शक आहेत.व्यक्तीच्या जगण्यासाठी मानवता आणि समता या मूलभूत तत्वांना प्राधान्य दिले पाहिजे. या तत्त्वावर आपलं भारतीय संविधान उभ आहे. आज या महामानवाचा महानिर्वाण दिन असला तरी त्यांचे विचार भविष्यात अनंत काळापर्यंत शाश्वत राहून सतत आपल्या भावी पिढ्यांना मार्गदर्शन करत राहणार आहेत.
या दरम्यान महाविद्यालयातील योगेश नवले, राजेंद्र राऊत, विशाल म्हञे, विकास इतापे, पांडुरंग परचंडे, संतोष भुजबळ, श्रीकृष्ण आवताडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.