दूधदर कपाती विरोधात अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक..
सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी विठ्ठलाला अभिषेक घालून घातले
साकडे...
प्रतिनिधी
आज दिनांक 28/11/2023 रोजी मोहोळ तालुक्यातील कुरूल येथे आज आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी कष्टकरी दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते, येत्या 15 दिवसात दरदर नाही वाढले तर त्याच्या पेक्षा तीव्र प्रकारचे आंदोलन केले जाईल असा प्रशासनाला इशारा देण्यात आला, यावेळी शासनाकडे खालील प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या,
1)शेतकरी कष्टकरी यांच्या दुधाचे कमी झालेले दर त्वरित वाढवून देण्यात यावेत,
2)गाईच्या दुधाला 40 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 70 रुपये दर देण्यात यावा.
3)शासनाने दिलेल्या दराचे पालन न करणार्या दूध संघावर कारवाई करण्यात यावी.
4)पशुखाद्याचे वाढलेले दर कमी करण्यात यावेत, या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने पाठींबा देण्यात आला.
यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रसेन जाधव, जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष समाधान जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, युवक जिल्हाध्यक्ष प्रविण घाडगे पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष सीताराम जाधव, रामचंद्र लांडे,बाळासाहेब लांडे, चिमाजी जाधव, पदमसिंह पाटील चेअरमन, कालिदास साळुंखे चेअरमन, भैय्या जाधव, अण्णा गोवर्धनकर, भैय्या खरात ऋषीकेश पाटील, भैय्या यादव, कल्याण घोडके, सागर जाधव, दादा माळी, अरुण साठे, तानाजी पवार, आणि दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,,