*पंढरपुर सिंहगड मध्ये महात्मा फुले यांना अभिवादन*
पंढरपूर: प्रतिनीधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १३३ व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी महाविद्यालयाचे संवेदनशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख, प्रा. नंदकिशोर फुले, प्रा. अविनाश हराळे आदीच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
महात्मा फुले यांनी समाजातील अनिष्ठ रूढी, प्रथा, परंपराविरोधात कंबर कसली होती. या कुप्रथा कायम हद्दपार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होतो. सत्यशोधक समाज संस्थेद्वारे महात्मा फुले यांनी समाजसुधारण्याचे व स्ञी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम महात्मा फुले यांनी केले असून पत्नी सावित्रीबाई फुले यांचा मदतीने समाजातील स्ञियांना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज च्या वतीने आदरांजली वाहिली.
ज्योतिबांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यावर काम केले. जनतेने त्यांना 'महात्मा' ही उपाधी १८८८ मध्ये बहाल केली. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी १८४८ मध्ये पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतीबा आपल्या भूमिकेवर ठाम असत. ज्योतिबांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई होय. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.
या दरम्यान महाविद्यालयातील डाॅ. शिरीष कुलकर्णी, प्रा. राहुल शिंदे, एकनाथ इंगवले, पांडूरंग परचंडे, विशाल म्हेञे, नवनाथ माळी, संतोष भुजबळ आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.