लक्ष्मी दहिवडी येथे महात्मा फुले यांना अभिवादन*

 *लक्ष्मी दहिवडी येथे महात्मा फुले यांना अभिवादन*



लक्ष्मी दहिवडी: 


लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची १३३ व्या स्मृतिदिनानिमित्त ध्येय क्रांती वाचनालय येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले असल्याची माहिती महात्मा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल बनसोडे यांनी दिली.

     थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १३३ व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९ च्या दरम्यान ध्येय क्रांती वाचनालय येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लक्ष्मी दहिवडी परसरातील अनेक फुले प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिना असुन ज्योतिबांनी अनेक ग्रंथांचे लिखाण केलेले आहे, शेतकऱ्याचा आसूड, ब्राम्हणांचे कसब, अशा अनेक प्रकारच्या ग्रंथांमधून त्यांनी समाज प्रबोधन केले होते, "प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते." असे म्हणणाऱ्या ज्योतिबांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

   विद्याध्यनासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास.

परि स्त्री शिक्षण; हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास,

या उक्तीप्रमाणे महात्मा जोतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्‍नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. स्री उध्दार व मानवसेवेच्या ध्येयाने आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते सामान्यांतील असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. ‘शिक्षण व समता’ या दोन शब्दांतच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल.

   अशा या थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यादरम्यान दत्तात्रय बनसोडे, महात्मा फुले बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य हणमंत क्षीरसागर, आयुब तांबोळी, बाळासाहेब वाघमारे, महेश बनसोडे, दगडू बनसोडे, गणपत बनसोडे, सोनाप्पा सोनवले, सावता परिषद अध्यक्ष सयाजी बनसोडे, मोहन वाघमारे, अर्जुन बनसोडे, मधुकर आदलिंगे, ज्ञानेश्वर कडलासकर, डाॅ. शिवाजी आदाटे, नितीन वाघ, मुकेश तोडकरी, सोमलिंग सरगर आदींसह अनेकांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले युवा मंच पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad