पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील वीजप्रश्न सोडवण्यासाठी महावितरण प्रशासनाने प्राधान्य द्यावे - सोमनाथ आवताडे

 पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील वीजप्रश्न सोडवण्यासाठी महावितरण प्रशासनाने प्राधान्य द्यावे - सोमनाथ आवताडे 



मंगळवेढा (प्रतिनिधी): पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे वीज प्रश्न तसेच या मतदारसंघातील आवश्यक आणि प्रस्तावित मागण्या पूर्ततेसाठी महावितरण विभागाने प्राधान्य द्यावे अशी मागणी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे युवक नेते सोमनाथ अवताडे यांनी केली आहे.


सोलापूर जिल्हा नियोजन भवन येथे महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळाच्या बैठकीस पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा आवताडे यांच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा युवक नेते सोमनाथ आवताडे,श्री. अविनाश मोरे व स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे यांनी उपस्थिती दर्शविली होती त्याप्रसंगी ते आपली भूमिका मांडत होते. शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज त्यांच्या सोयीच्या वेळेत मिळावी यासाठी माजी सभापती आवताडे यांनी आग्रही भूमिका यावेळी मांडली. रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतीच्या ठिकाणी अपघात घडण्याच्या बातम्या कानावर येत आहेत याकडेही त्यांनी महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधले.


सदर प्रसंगी महावितरण संचालक विश्वास पाठक यांच्याशी पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील आवश्यक व प्रस्तावित मागण्या तसेच वीज प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख आमदार शहाजीबापू पाटील तसेच महावितरण विभागाचे संबंधित अधिकारी पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad