*पंढरपूर सिंहगड मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधान दिन हा राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, युवराज आसबे, अविनाश वाघमारे, विद्यार्थी प्रतिनिधी नागेंद्रकुमार नायकुडे आदी मान्यवरांच्था हस्ते करण्यात आले यादरम्यान महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले. दरम्यान संविधान दिनाबद्दल माहिती सांगण्यात आली.
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्विकारला. म्हणून संविधान दिन साजरा केला जातो तसेच २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले या सर्वांना अभिवादन करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यासह राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमित इंगोले, प्रा. अजित करांडे, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. सिद्धेश्वर गणगोंडा, प्रा. अतुल आराध्ये, एनएसएस प्रेसिडेंट नागेंद्रकुमार नायकुडे एनएसएस सेक्रेटरी अथर्व कुराडे या समवेत एनएसएस विभागीय प्रतिनिधी नाना वाघमारे, चेतन मासाळ, राशिद पठाण, प्रणव देवराम, गीतांजली देशमुख, प्राची डोंगरे. यांच्या सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.