भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी शिवम देवशटवार

 भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी शिवम देवशटवार  यांची निवड 

नळेगाव प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लातूर ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी नळेगाव येथील युवा कार्यकर्ते शिवम उमाकांत देवशटवार यांची निवड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे यांनी केली आहे.



या निवडीबद्दल अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी नळेगाव येथे शिवम देवशटवार यांचा यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गंगाधर देवशटवार, उमाकांत देवशटवार, राम रेड्डी, गजानन बिराजदार, रामानंद मुंडे, दत्ता सिंदाळकर, शेखर धामणगावकर, गोविंद मानखेडे, शुभम बैरागी, मनोज पांचाळ, गणेश कोंडेकर, कचरू गंगापुरे, ओमकार देवशटवार आदींसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते. 

या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.