आधुनिक भारताच्या प्रगतीचा खरा आधार म्हणजे आपले संविधान
- डॉ.यशपाल खेडकर
स्वेरीमध्ये ‘भारतीय संविधान दिन’ साजरा
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ‘भारतीय संविधान दिन’ साजरा करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याकडून प्राप्त परिपत्रकानुसार व स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उपस्थितीत हा ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी उपस्थितांना ‘भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली, भारतीयांचे मुलभूत हक्क व अधिकार, लोकशाही शासन पद्धतीचे महत्व, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव आदी बाबत सविस्तर माहिती देवून भारतीय संविधानाचे महत्व पटवून दिले. आधुनिक भारताच्या प्रगतीचा खरा आधार म्हणजे आपले संविधान आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी.एस.चौधरी, डॉ.एम. एम. आवताडे, प्रा.आर.एस. साठे, विद्यार्थी प्रतिनिधी पारस जाधव, विद्यर्थिनी प्रतिनिधी अंकिता सरडे, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.