आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त १६६७ रुग्णांची नेत्र व मोतीबिंदू तपासणी आणि चष्मे वाटप
मंगळवेढा (प्रतिनिधी): पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी शिबीरांचे आयोजन केले असून आज मोफत नेत्र तपासणी मध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया तसेच गरजूंना मोफत चष्मे वाटप या कार्यक्रमाचा शुभारंभ आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा.लि.चे चेअरमन तथा नामवंत उद्योगपती संजय आवताडे यांच्या हस्ते करण्यात केले. या नेत्ररोग तपासणी शिबिरामध्ये १६६७ रुग्णांची नेत्रतपासणी करून १२९३ रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच १८४ रुग्णांची मोतीबिंदू तपासणी करुन त्यापैकी ३४ मोतीबिंदू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अखिल भाविक वारकरी मंडळ महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीमती पार्वती आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये नॅब हॉस्पिटल मिरज येथे व्यवस्था करुन संबंधित रुग्णांना मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.
सामान्य रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसणारी समाधानाची लहर या उपक्रमाच्या यशस्वीतेची पावतीच असणार आहे, तुमच्या चेहर्यावरचा आनंद खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान देणारा असेल त्याकरिता अशा विविध सामाजिक शिबीरांचे आयोजन आमदार समाधान आवताडे जनसंपर्क कार्यालय यांच्यावतीने आयोजन करण्यात आले असल्याचे मत चेअरमन संजय आवताडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या शिबिरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. गणेश इंदुरकर, डॉ मनोज भायगुडे, डॉ निखिल तोष्णीवाल, डॉ निनाद नागणे, डॉ लक्ष्मीकांत मर्दा, डॉ नंदकुमार शिंदे, भूलरोग तज्ञ डॉ जाधव, नॅब हॉस्पिटल मिरज चे डॉ प्रशांत मनोरकर, अनिल यादव, अक्षय ठेंगील, नेत्र चिकित्सा अधिकारी एल. आर. खांडेकर, किरण बोराडे, श्रीकांत कल्याणी, अनिल खटके, एम. व्ही. हिरेमठ, प्रमोदकुमार म्हमाणे, सि.टी.पवार, शहाजन मुलाणी, सर्जे, राऊत, जाधव, कोळेकर आदी नामवंत नेत्रतज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे, तालुका आरोग्य विभागातील अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी, तसेच तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर, महिला हॉस्पिटल मंगळवेढा येथील स्टाफ यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, शशिकांत चव्हाण, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोज काझी, दत्तात्रय जमदाडे, निलाताई आटकळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगन्नाथ रेवे, संतोष मोगले, चंद्रकांत पडवळे, कैलास कोळी, सुरेश भाकरे, भारत निकम, लक्ष्मण जगताप, राजन पाटील, बापूराव काकेकर, विजय माने, युवराज शिंदे, दादासाहेब ओमणे, खंडू खंदारे, विनायकराव यादव, शिवाजी सरगर, दिगंबर यादव, सचिन शिंदे, सिद्धेश्वर दत्तु, रमेश टाकणे, सत्यजित सुरवसे, सुहास पवार, आनंद मुढे, सुदर्शन यादव, जनार्धन डोरले, शाम पवार, अशोक लेंडवे, परमेश्वर पाटील, सतिश मोहिते, संजय माळी, पप्पू वाडेकर, सुरेश मेटकरी, शिवाजीराव वाकडे, नागेश डोंगरे, दादासाहेब डोंगरे, सुशांत हजारे, अतुल मुरडे, चंद्रकांत गरंडे, विकास पुजारी, गंगाधर काकणकी, साहेबराव उगाडे, उमेश आवताडे, डॉ सुभाष तानगावडे, बिरा लवटे, नागेश मासाळ, प्रकाश भोसले, सुधीर करंदीरकर यांचेसह इतर मान्यवर, तसेच मतदार संघातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर पदाधिकारी, नागरिक व नेत्ररुग्ण उपस्थित होते.