*पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी कार्तिकी वारीमध्ये जोपासली सामाजिक बांधिलकी*
पंढरपूर: प्रतिनिधी
वर्षभरात येणाऱ्या एकादशींपैकी आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते. तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात.याच
कार्तिकी वारी मध्ये वारकऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा यासाठी पोलीस मित्र म्हणून महाविद्यालयाचे विद्यार्थी यांची मदत घेतली जाते आणि विविध ठिकाणची माहिती व सुविधा उपलब्ध करून ती वारकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाते व त्यांना मदत करणे यासारखी कामे वारी काळात करून पोलीस प्रशासनास मोठी मदत आणि सहकार्याचं काम केलेले आहे
यामध्ये सिंहगड महाविद्यालयातून राष्ट्रीय सेवा योजना मधून जवळ 50 विद्यार्थ्यांनी वारी काळामध्ये उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख प्रा. सुमित इंगोले
एनएसएस प्रेसिडेंट नागेंद्रकुमार नायकुडे, या समवेत सुमित गुडे, दिनेश रंदवे, नवीन जाधव, तेजस खरे, सोहेल देशमुख या विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थ्यांनी वारीकाळात पोलीस मित्र स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदवला.