पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आ. समाधान आवताडे यांचे मंगळवेढा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व

 पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आ. समाधान आवताडे यांचे मंगळवेढा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व



प्रतिनिधी -


नुकत्याच संपन्न झालेल्या मंगळवेढा तालुक्यातील एकूण २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूकांमध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार समाधान आवताडे यांच्या विचारांनी २७ पैकी तब्बल १३ ग्रामपंचायतींवर आपले एकहाती वर्चस्व राखत विजयाचा झेंडा फडकवला आहे.


या टप्प्यात झालेल्या या निवडणुकीमध्ये आ आवताडे यांच्या नेतृत्वाखाली जुनोनी, देगाव, अकोले, बठाण उचेठाण, महमदाबाद हु, जंगलगी , मुंढेवाडी, लमाणतांडा, लक्ष्मीदहिवडी, नंदूर, हिवरगांव, निंबोणी या स्थानिक स्वराज्य संस्थांवर आ आवताडे यांच्या राजकीय विचारांच्या शिलेदारांनी एकहाती विजयाची कमान उभी केली आहे. तर उर्वरित खडकी, शेलेवाडी, भाळवणी, खुपसंगी, रड्डे, जालिहाळ, ब्रह्मपुरी या ७ ग्रामपंचायतवर आ आवताडे यांच्या गटातील उमेदवारांनी स्थानिक पातळीवर आघाड्या करुन सदस्य पदावर आपली विजयी बाजी मारली आहे.


सर्व विजयी नूतन पदाधिकाऱ्यांचा आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे कृषी बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये फेटा बांधून सत्कार करत अभिनंदन करण्यात आले. यावेळी सरपंच विनायक यादव, विजय माने,  माजी संचालक पप्पू काकेकर, भारत निकम, सरपंच शिवाजी सरगर यांच्यासह तालुक्यातील इतर मान्यवरांनी सर्वच विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.


पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची आमदारकी आपल्या खांद्यावर घेतल्यापासून आमदार अवताडे यांनी कोणताही राजकीय आकस मनामध्ये न ठेवता मतदारसंघातील सर्वच नागरिकांच्या मूलभूत व पायाभूत विकासासाठी सलोख्याचे समाजकारण व राजकारण करून मतदार संघाच्या विकासाला गती दिली आहे. आमदार आवताडे यांच्या या विकासाभिमुख दूरदृष्टीचा या ग्रामपंचायत निकालांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad