बळीराजा साठी आपन लवकरात लवकर मंजूर झालेले २२० केव्ही सबस्टेशन चे काम सुरु करा:- नंदकिशोर मापारी
प्रतिनिधी लोणार
लोणार तालुक्यात दिसभरात अनेक वेळा लाईन जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.सद्या विजेच्या समस्या ने शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे अनेक दिवसांपासून लोणार साठी २२० केव्ही चे सबस्टेशन मंजूर झालेले आहे परंतु आजून त्याचे काम सुरू झाले नाही २२० केव्ही सबस्टेशन लवकर काम सुरू करून ते सुरू केल्यास लोणार तालुक्यातील विजेची समस्या मिटेल तालुक्यातील गंधारी, शारा ,वझर आघाव, चिंचोली सांगळे, या गावातील शेतकरी यांनी आज ४ नोव्हेंबर ला सबस्टेशन ला येऊन संबंधी अधिकारी सोबत आपल्या व्यथा मांडल्या त्यांनी शेतकरी बांधवांना होणाऱ्या लाईन च्या समस्या तात्काळ सोडून नियमित लाईन द्यावी असे या वेळी सांगितले तसेच देऊळगाव कुंडपाळ, सरस्वती, अंजनी खुर्द, या गावात नवीन ३३ केव्ही चे सबस्टेशन तात्काळ सुरू करा तसेच टिटवी, देऊळगाव कुंडपाळ, किंनगाव जटटू, सुल्तानपूर या ठिकाणी नवीन पावर ट्रान्सफार्मर सुरू करण्यात यावे तसेच सध्या दिवाळी जवळ आली असून बळीराजा ची दिवाळी प्रकाशा मध्ये साजरा करण्यात यावी त्यासाठी त्यांना वेळे अभाव लाईन कशी देता येईल त्यांची दक्षता घ्यावी व येणाऱ्या पीक काचे नुकसान होऊ नये अशी मागणी या वेळी शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी केली असून या वेळी शहर प्रमुख पांडुरंग सरकटे ,पांडुरंग मुंडे ,रामेश्वर सांगळे, आणी तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते