पंढरपूर सिंहगड मधील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा*

 *पंढरपूर सिंहगड मधील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा*



पंढरपूर: प्रतिनिधी 



एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा, कौतुक सोहळा निरोप समारंभ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

 यावेळेस बोलतना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले, कोणतेही क्षेत्रांमध्ये प्रामाणिक आणि जबाबदारीने केलेले काम नक्कीच महत्वाचे असते व त्यानंतरच त्याची प्रगती होते असे मतं प्राचार्य डॉ कैलास करांडे बोलताना म्हणाले.

  या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकेत प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी सांगितले की राष्ट्रीय सेवेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांची मदत आपल्याला होत असते व तेच डोळ्यासमोर ठेवून आपण यामध्ये काम केले पाहिजे असे त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यांत्रिकी विभाग समन्वयक डॉ .अतुल आराध्ये यांनी विद्यार्थ्यांना एनएसएसचा फायदा व्यवहारिक जीवनामध्ये सुद्धा दिशादर्शक ठरणार असे मतं व्यक्त केले. त्यानंतर एनएसएस मधील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले तसेच डबल महाराष्ट्र केसरी युथ फाउंडेशनचे चेअरमन व डबल महाराष्ट्र केसरी पै‌ चंद्रहार पाटील यांच्या हस्ते सामाजिक बांधिलकी समाज उपयोगी काम यामध्ये बेस्ट रोल अवार्ड भेटलेले यिन स्टुडन्ट इन्स्पायर नेटवर्क यामधून एस. के. एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी पंढरपूर, यिन महाविद्यालय अध्यक्ष तथा यिन सोलापूर जिल्हाकार्याध्यक्ष व यिन वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य या जबाबदारीवर गेले एक वर्ष कार्यरत असणारे राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस केंद्र सरकार यामध्ये मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जबाबदारी गेले सहा वर्ष अविरतपणे कार्यरत असणारे म

अर्थात एनएसएस यामध्ये आषाढी वारी व तीर्थक्षेत्र पंढरपूर पोलीस मित्र व अन्न व औषध प्रशासन विभाग यामध्ये गेले सहा वर्ष एनएसएस स्वयंसेवकाच्या मदतीने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत असणारे असे विद्यार्थी व्यक्तिमत्व म्हणजे विद्युत विभागातील व एनएसएस क्लबचे प्रेसिडेंट नागेंद्रकुमार नायकुडे यांना *सर्वोत्कृष्ट एनएसएस स्वयंसेवक पुरस्कार* प्राचार्य.डाॅ.कैलास करांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

  यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की काम करत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता काम केल्यानंतर तुम्ही केलेल्या कामावर अपेक्षा पेक्षा जास्त फळ भेटत यासाठी सर्वांनी प्रामाणिक काम करावं व प्रयत्न करावे ,व समाज हितासाठी व समाज उपयोगी उपक्रमसाठी तुमचं योगदान कायमस्वरूपी द्या अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी सर्व कामांमध्ये एक सुंदरता जपली पाहिजे व एकजुटीने काम केले पाहिजे असे आपले मत मांडले. व त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी खांडेकर व वैष्णवी कंडरे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार हर्षद शिंदे यांनी मांडले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख व प्रा. सुमित इंगोले, डॉ. अतुल आराध्ये प्रा. अजित करांडे, प्रा.अर्जुन मासाळ, प्रा. सिद्धेश्वर गणगोंडा यांच्यासह एनएसएस प्रेसिडेंट नागेंद्रकुमार नायकुडे, एनएसएस सेक्रेटरी अथर्व कुराडे, प्रमुख विद्यार्थी प्रतिनिधी किशोर नरळे, नाना वाघमारे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी रशीद पठाण, हर्षद शिंदे, सत्यम कापले, आकाश चौगुले, अनुप नायकल, प्रणव देवराम, सुमित अवताडे, वैष्णवी कंडरे, श्रद्धा पंधे, साक्षी भिवरे, प्राप्ती रुपनर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad