*पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात ३ दिवशीय कार्यशाळा संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी तालुका पंढरपूर येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन, आय आय सी आणि इन्स्टिट्यूट इनक्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने पीएलसी, रोबोटिक्स आणि ड्रोन टेक्नॉलॉजी वरती ३ दिवशीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पीसीएल रोबोटिक्स आणि ड्रोन टेक्नॉलॉजी वरती विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी व इतर शिक्षक कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रोस्ताहन देवून कार्यशाळाची सुरवात केली. सुरुवातीस कार्यशाळाची माहिती प्रा. किशोर जाधव यांनी दिली. .
या कार्यशाळेत इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी अक्षय नागणे यांनी पीएलसी दिनेश रणदिवे यांनी रोबोटिक्स आणि बालाजी पवार यांनी ड्रोन टेक्नॉलॉजी वरती महिती सांगितली. तसेच अक्षय नागणे यांनी पीएलसी चा वापर येणाऱ्या आधुनिक युगात कसा आणि त्याचे फायदे काय असु शक्ततात हे सांगितले. दिनेश रणदिवे यांनी रोबोटिक्स मध्ये फायर Fighting, फायर Fighting रोबोटरची ची निर्मीती कशी करावी व त्याचे फायदे तसेच ते कुठे वापरले जाऊ शकते याची माहिती दिली. तसेच बालाजी पवार यांनी इलेक्ट्रॉनिकचा नवीन युगातील महत्त्व पटवुन दिल आणि त्यांनी विद्यार्थ्याना ड्रोन कसा बनवायचा हे देखील शिकविले. हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख डाॅ. भालचंद्र गोडबोले, प्रा. किशोर जाधव व अंतीम वर्षाय इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी अक्षय नागणे, ,दिनेश रंदवे, बालाजी पवार, अनिकेत साळुंखे, ऋत्विक भानवसे, निखिल जगताप,विजय व्यवहारे, अविष्कार भोसले आदींनी परिश्रम घेतले. या कार्यशाळत मार्गदर्शन प्रा. किशोर जाधव यांनी केले तसेच प्रा. अंजली चांदणे, प्रा.विनोद मोरे ,प्रा. प्रदीप व्यवहारे प्रा. स्वप्ना गोड उपस्थित होते. तर उपस्थितांचे आभार प्रा. नागनाथ खांडेकर यांनी मानले.