लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत पाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची बैठक संपन्न

 लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत पाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची बैठक संपन्न

 सभापती विक्रांत पाटील शिंदे ॲक्शन मोडवर !


लोहा (शुभम उत्तरवार). 


 लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा सहचिटणीस विक्रांत पाटील शिंदे यांनी लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाचे सूत्र हाती घेताच लोहा बाजार समितीला वैभव मिळवून देण्यासाठी कंबर कसली असून तालुक्यातील शेतकरी ,व्यापारी, हमाल मापारी, व्यापाऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी व  बाजार समितीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सभापती विक्रांत पाटील शिंदे हे ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे, मागील दोन दिवसापूर्वी बाजार समितीची पहिली मासिक सभा सभापती  व संचालक मंडळाच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली होती, काल दिनांक 22 नोव्हें बुधवार रोजी सभापती विक्रांत पाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती कार्यालयात तालुक्यातील व शहरातील सर्व व्यापारी बांधवांची बैठक घेण्यात आली. यावेळी कापूस व्यापाऱ्यांशी सभापती शिंदे यांनी सखोल चर्चा केली व कापूस व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या माध्यमातून टिन शेड लवकरच उभारून देण्यासाठी आश्वासित केले,  मी सभापती या नात्याने उपसभापती व संचालक  मंडळ हे व्यापारी बांधवांच्या सदैव पाठीशी असून व्यापारी बांधवांनीही शेतकऱ्यांची आर्थिक लूट करू नये अन्यथा शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांचीही गयी केली जाणार नसल्याचे यावेळी सभापती विक्रांत पाटील शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी व्यापारी बांधवांच्या वतीने सभापती शिंदे यांचा शाल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती शिंदे यांनी व्यापारी बांधवांशी विविध विषयावर संवाद साधला, सभापती शिंदे यांनी या अगोदरही  नुकत्याच झालेल्या पहिल्या मासिक बैठकीत बाजार समिती मध्ये गैरवर्तन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांना दम दिला होता. लोहा बाजार समिती महाराष्ट्रात मॉडर्न बनवण्यासाठी लोहा बाजार समितीमध्ये ज्या काही  उणीवा आहेत त्या उनिवा दूर करण्यासाठी सभापती शिंदे हे ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व तालुक्यातील शेतकरी बांधव, व्यापारी, हमाल मापारी यांच्या समस्या बाजार समितीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी मी सभापती या नात्याने सदैव कटिबद्ध असल्याचे सभापती विक्रांत पाटील शिंदे यांनी बैठकीत बोलताना सांगितले यावेळी उपसभापती अण्णाराव पवार , सचिव आनंद घोरबांड, सह सचिव भोसीकर,  व्यापारी बांधव, संचालक मंडळ सह बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad