ग्रामपंचायत सरपंच व सचिव जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून नागरीकांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे. शेख सज्जाद प्रतिनिधी लोणार

 ग्रामपंचायत सरपंच व सचिव  जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून नागरीकांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे.



शेख सज्जाद प्रतिनिधी लोणार


   लोणार तालुक्यातील अजिसपुर गावांमध्ये नागरिकांनी सरकारी तसेच रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या अतिक्रमण करून कोणी पक्के तर कोणी कच्चे बांधकाम केले आहे.तसेच आज रोजी जो तो शासकीय जागेवर अतिक्रमण करून तसेच घराच्या मुळ जागा सोडुन पुढे नालीवर बांधकाम करून अतिक्रमण करीत आहेत.त्याचप्रमाणे आज रोजी सुरू असलेल्या जलजिवन मिशन काम सुरू असुन संबंधीत ठेकेदारांनी पाईप लाईन करीता खोदकाम केले आहे.परंतु अदयाप पर्यंत रस्त्यावरील मटेरीयल उचलले नसल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे सर्व दिसत असतांना सुध्दा ग्रामपंचायत सरपंच व सचिव मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून नागरीकांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे.

   तेव्हा अर्जाच्या अनुषंगाने पंचायत समिती अधिकाऱ्यांनी तात्काळ मौजे अजिसपुर गावामध्ये असलेले अवैध अतिक्रमणाची पाहणी करून तात्काळ अतिक्रमण हटविण्यात यावे तसेच रस्त्यावरील मटेरीयल काढुन घेण्याची कार्यवाही करावी. सदर विषयाची पंचायत समिती कार्यालयाने दखल घेऊन कारवाई करण्यात यावी,अन्यथा तक्रार करते सामाजिक कार्यकर्ते संतोष कुलाळ यांनी पंचायत समितीला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.