*पंढरपूर सिंहगडचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांची दुबई येथील "आंतरराष्ट्रीय शोध निबंध" परिषदेत" प्रमुख उपस्थिती*
पंढरपूर: प्रतिनिधी
ग्लोबल रिसर्च फोरम व आय डी एम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी शारजाह यांच्या संयुक्त विद्यमानाने "शाश्वत बिझनेस ग्रोथ चॅलेंजेस मेजर्स सोल्युशन्स इन ग्लोबल परिदृश्य" या विषयावर दुबई येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शोध निबंध परिषद आयोजित करण्यात आली होती. या आंतरराष्ट्रीय शोध निबंध परिषद मध्ये कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सञाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ता म्हणून काम पाहिले आहे.
या आंतरराष्ट्रीय शोध निबंध परिषद च्या उद्घाटन प्रसंगी आय डी एम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, शारजाह चे अध्यक्ष डाॅ. अमिताभ उपाध्या, हिमालयन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डाॅ. प्रकाश दिवाकरन, शारजाह येथील आय डी एम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सीओओ प्रियंता नीलावाल, पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, मदुराई कामराज विद्यापीठातील प्रा. खान हिदायथुल्ला, डाॅ. एम. शिवकुमार, कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठातील डाॅ. कृष्णराज व्ही, युडोक्सिया संशोधन डाॅ. टी. योगेश बाबू, डाॅ. कोटेश्वर बाबू आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या आंतरराष्ट्रीय शोध निबंध परिषद मध्ये आय डी एम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि जी आर सी एफ द्वारे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज च्या वतीने प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना उत्कृष्ट प्राचार्य म्हणून या आंतरराष्ट्रीय शोध निबंध परिषद मध्ये सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
या परिषदेत डाॅ. कैलाश करांडे हे उद्घाटक व व्याख्यान दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यातील बहुउद्देशीय शाखीय क्षेत्रातील शोध निबंध सञ अध्यक्ष म्हणून डाॅ. कैलाश करांडे यांनी जबाबदारी पार पाडली. या आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेसाठी जगभरातून आलेल्या विविध शोधनिबंधाचे परिक्षण करून पुढील वाटचालीस सुचना देण्यात आल्या. यामध्ये एकुण १६ आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संयुक्त उपक्रमातून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३१ शोधनिबंध सादर करण्यात आले.
हि आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद १९ व २० नोव्हेंबर २०२३ या दोन दिवसीय कालावधीत मध्ये आयोजित करण्यात आली. या मध्ये अनेक निमंञित चर्चा आणि प्रस्तुत पेपर्स च्या माध्यमातून सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच चिंतनशील संशोधन, उद्योग तज्ञ आणि विद्वानांना शाश्वत वाढीची गुंतागुंत शोधण्यासाठी एक गतिशील व्यासपीठ प्रदान करण्यात आले. आर्थिक अनिश्चितता, नियामक लँडस्केप आणि सामाजिक अपेक्षांवर चर्चा करण्यात आली. ज्या मध्ये जबाबदार आणि टिकाऊ वाढीच्या गरजेवर जोर देण्यात आला. अशा प्रकारे हि आंतरराष्ट्रीय शोध निबंध परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली