*मंगळवेढा ते रायगड ३०५ किमी सायकल मोहिमेतून केली शिवविचारांची पेरणी*
(वारी परिवाराचा अनोखा उपक्रम)
दुर्गराज रायगड संवर्धन व पर्यटन विकास जनजागृतीसाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी छत्रपतींना साकडे घालण्यासाठी मंगळवेढा ते रायगड ऐतिहासिक सायकल मोहिमेसाठी वारी परिवाराच्या सायकलस्वारांनी ३०५ किलोमीटरचे अंतर सायकलवर पार शिव विचारांची पेरणी करून रायगड मोहिम फत्ते केली
३१ जुलै २०२२ रोजी बानुरगड येथील बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळावरती किल्ले रायगडला जाण्याचा संकल्प केला होता तो संकल्प मात्र सायकल मेहिमेच्या माध्यमातून पूर्णत्वास गेलेला आहे
मंगळवेढ्याच्या शिवालयातील शिवमुर्तीचे पूजन करून चार दिवसाच्या ऐतिहासिक सायकल मोहीमेत पंढरपूर-वेळापूर-माळशिरस- नातेपूते-फलटण-शिरवळ-भोर-वरंध-महाड-पाचाड-रायगड या मार्गावर गडकोट स्वच्छता व संवर्धन विषयी जनजागृतीपर पत्रके वाटण्यात आली तसेच जागोजागी मोहिमेचे स्वागतही करण्यात आले पाचाड याठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंच्या समाधीस्थळी पूजन करून दिपोत्सव साजरा करण्यात आला
सकाळी सहा वाजता रायगडाच्या पायथ्यापासून पायी चालत २९ जणांनी गड सर केला जगदीश्वर मंदीर,बाजापेठा,छत्रपती शिवरायांची समाधी,राजवाडा,वाडे,महादरवाजा, शिरकाई मंदीर,राजदरबार, अष्टप्रधान वाडे व सप्त मंजिली बुरुज आदि ठिकाणांना भेटी देऊन गाईड राजेंद्र गायकवाड यांनी तरूणांना वैभवशाली इतिहासाची ओळख करून दिली इतरांना मदत कशी करावी तसेच अडचणीच्या काळात प्रसंग ओळखून कसे सामोरे गेले पाहिजे,प्राणी मात्रावर दया केली पाहिजे असे अनेक शिवविचार या मोहिमेत शिकायला मिळाले
शिवाय यातील काही तरुणांनी स्वच्छता अभियान देखील राबवले तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी देखील होळीच्या माळावर दिमाखात उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास साकडे घातले
दरम्यान महाड दौऱ्यावर आलेले मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांनी या ऐतिहासिक सायकल मोहीमेत सुहास ताड, चंद्रकांत शहा, दत्तात्रय आसबे, सिद्धेश्वर डोंगरे, पवन टेकाळे, समर्थ महामूनी, रोहन सुर्यवंशी, भारत नागणे गणे, स्वराज कलुबर्मे, सौरभ मुढे, हर्षद वस्त्रे, संजय जावळे, रोहित वाघ, पांडूरंग कोंडूभैरी, प्रा विनायक कलुबर्मे या सायकल स्वारांचे कौतुक केले होळीच्या माळावर प्रमाणपत्र देऊन सायकल स्वारांचा सन्मान करण्यात आला यावेळी छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने रायगडचा परिसर दणाणून गेला होतायावेळी अविराज अवताडे,रतिलाल दत्तू,अरुण गुंगे,निलेश शहा,श्रावण गुंगे, गणेश दत्तू,निखिल कसगावडे समीर गुंगे,अभय गायकवाड,मारुती गायकवाड,अजय अदाटे, समीर जाधव,महेश डोरले,प्रकाश दिवसे,सतीश दत्तू उपस्थित होते