लोहा शहरात लोककल्याणकारी योजना प्रत्यक्षात राबविल्यात -- नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी
----------------------------------------
लोहा ता. प्रतिनिधी (शुभम उत्तरवार).
आपण काम जादा व बाते कम करून ल़ोहा शहरात अनेक कल्याणकारी योजना राबविल्यात असे प्रतिपादन लोहा न.पा.चे कर्तव्यदक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी शिवकल्याण नगर येथे सांस्कृतिक सभागृह बांधकामांच्या भूमीपूजन सोहळ्यात केले.
लोहा शहरातील शिवकल्याण नगर येथे डीपीडीसीतून नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या प्रयत्नातून ५० लक्ष रुपये निधधीचे सांस्कृतिक सभागृह मंजूर करण्यात आले व या सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामांचे भूमीपूजन दिवाळी - पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवकल्याण नगर येथील जेष्ठ नागरिक गुलाबराव पाटील मोटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहा न.पा.चे जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, नगरसेवक बालाजी खिल्लारे, नगरसेवक करीम शेख, नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक नबीसाब शेख, नगरसेवक अमोल व्यवहारे, संजय चव्हाण , काशिनाथ स्वामी मंदिर पुजारी आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले की, काही लोकांनी " बाते जादा व काम कम "असे केले आहे पण आपण तसे न करता "काम जादा व बाते कम" असे केले आहे.
लोहा शहरांचा सार्वगिन विकास केला आहे. निवडणुकी मध्ये जे -जे आश्र्वासन दिले होते ते पुर्ण केले आहे.
अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे राजकारण केले आहे पण माझ्या कार्यकाळातच लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविला आहे.
तसेच लोहा शहरातील सर्व वार्डात विविध विकास कामे केली आहेत लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत असे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले.या वेळी शिवकल्याण नगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.