पंढरपूर सिंहगड मध्ये " फंडामेंटल ऑफ फजी लॉजिक" या विषयावर व्याख्यान संपन्न

 पंढरपूर सिंहगड मध्ये " फंडामेंटल ऑफ फजी लॉजिक" या विषयावर व्याख्यान संपन्न 




पंढरपूर: प्रतिनिधी


        एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग व इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर्स (आई.ई.टी.ई) यांच्या संयुक्त विद्यमाने व कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागात चतुर्थ वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रा.आशिष जोशी यांचे " फंडामेंटल ऑफ फजी लॉजिक" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले व हा प्रोग्रॅम उत्साहात संपन्न झाला अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली. 

      प्रा.आशिष जोशी यांनी सध्याच्या युगात फजीचे चे महत्व , फजी मध्ये प्रोग्रामिंग कसे करायचे, फजीफिकेशन याविषयी प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखवले .

       याबद्दल माहिती देताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले की ,विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व नोकरीत संधी मिळण्याच्या प्रक्रियेतील एका महत्त्वाचा भाग म्हणून असे कार्यक्रम नेहमीच आयोजित केले जातात.

       या प्रोग्रॅम अंतर्गत चतुर्थ वर्गात शिकणाऱ्या सत्तर विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. हा प्रोग्रॅम पार पाडण्यासाठी विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी , प्रा.अंजली पिसे,प्रा.वैभव गोडसे व विदयार्थी प्रतिनिधी म्हणून मीनाक्षी जाविर यांनी जबाबदारी पार पाडली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad